भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे म्युझियम उभारण्याचा राज्य सरकारचा संकल्प

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची जन्मभूमी भगूर येथे लवकरच वीर सावरकरांचे म्युझियम उभारण्याचा संकल्प शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात आला आहे. २६ फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त या म्युझियमबाबत घोषणा राज्य सरकारच्या पर्यटन विभागातर्फे करण्यात येणार असून महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळातर्फे हे म्युझियम उभारण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

( हेही वाचा : Agniveer Recruitment : अग्निवीर भरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल! उमेदवारांच्या शारीरिक आणि मानसिक सुदृढतेवर भर)

आत्मार्पण दिनानिमित्त होणार विशेष कार्यक्रम

शिवसेनेच्या कार्यकारणीच्या बैठकीत नुकताच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा ठराव करण्यात आला आहे. यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने म्युझियम बाबत निर्णय घेतला असून वीर सावकरांच्या जन्मगावी आत्मार्पणदिनी विशेष कार्यक्रमाची घोषणा पर्यटन विभागातर्फे करण्यात आली आहे.

भगूर येथे प्रस्तावित असलेल्या थीम पार्कसोबतच आता वीर सावरकरांचे म्युझियम उभारण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहे. भगूरमधील आठवडी बाजारामधील म्युन्सिपाल्टी गार्डन येथे हे म्युझियम उभारण्यात येणार आहे. याची घोषणा येत्या २६ फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. भगूर येथे पर्यटन विभागामार्फत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एका वृत्तपत्राला दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here