नितेश राणेंना 8 जानेवारीला अटक होणार?

पुन्हा शुक्रवारी अर्थात 7 जानेवारीला दुपारी 2:30 वाजता होणार सुनावणी

61

गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असणाऱे भाजप नितेश राणे यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी न्यायालयाकडे दोन दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे नितेश राणेंची अटक तूर्तास तरी टळली आहे.

राज्य सरकारची उच्च न्यायालयात ग्वाही 

या प्रकरणाची पुढील सुनावणी आता पुन्हा शुक्रवारी अर्थात 7 जानेवारीला दुपारी 2:30 वाजता होणार आहे. या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूचे वकील काय युक्तिवाद करणार आणि नितेश राणेंना अटक होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई होणार नसल्याची ग्वाही राज्य सरकारकडून देण्यात आल्याने नितेश राणे यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. प्रतिज्ञापत्र सादर होत नाही तोपर्यंत नितेश राणेंना अटक करण्यात येणार नाही अशी ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे.

(हेही वाचा – …तर मुंबईत ‘लॉकडाऊन’ अटळ, काय म्हणाले आयुक्त चहल)

काय होते प्रकरण

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा कणकवलीत हल्ला झाला होता. हा हल्ला भाजप आमदार नितेश राणे यांनी घडवून आणला असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. या प्रकरणी नितेश राणे यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. चौकशीदरम्यान आमदार नितेश राणे यांचेही नाव आल्याने त्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी अटक पूर्व जामीनासाठी सिंधुदुर्गातील न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाची दारं ठोठावली होती. आज उच्च न्यायालयात नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होती. या प्रकरणी सोमवारी नितेश राणेंच्या वकिलांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज करून सिंधुदुर्ग सेशन कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. मात्र राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितल्याने आता नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजेच 7 जानेवारी रोजी होणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.