राज्यात २०१९ पासून राज्यात पोलीस भरती होऊ शकलेली नाही. राज्य सरकारने २०२२मध्ये पोलीस भरतीला हिरवा कंदील दिला असून राज्यातील पोलीस दलात मेगा पोलीस भरती होणार आहे. राज्यातील विविध पोलीस दल आणि राज्य राखीव पोलीस दलात तब्बल २० हजार पोलीसांची भरती केली जाणार आहे. मेगा पोलीस भरती प्रक्रिया ३ नोव्हेंबर २०२२पासून सुरू होणार असून ऑनलॉइन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२२ अशी असणार आहे.
महाराष्ट्र राज्य सरकार पोलीस खात्यासाठी २० हजारहून अधिक पात्र उमेदवारांना नियुक्त करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पहिल्या टप्प्यासाठी ८ हजार अर्जदार आणि दुसऱ्या टप्प्यासाठी १२ हजार अर्जदारांसह अर्जदारांना दोन टप्प्यात नियुक्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे, महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ साठी सर्व उमेदवारांनी तयारी सुरू करावी, कारण येत्या काही दिवसांत घोषणा होणार आहे.
Join Our WhatsApp Community