जगभरातील ११ देशांमध्ये आढळलेल्या मंकीपॉक्स या आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर देशातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. देशभरात कुठेही मंकी पॉक्स या आजाराचा रुग्ण आढळलेला नसताना मुंबई पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून कस्तुरबा रुग्णालयात २८ खाटांचा विशेष वॉर्ड सुरु केला आहे.
( हेही वाचा : राज्यात पुढल्या वर्षी सुरु होणार अॅक्युपंक्चर थेअरपीची महाविद्यालये)
आफ्रिका उपखंडामध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या मंकीपॉक्स या आजाराने सध्या ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, युके, युएसए या देशांमध्ये सध्या कहर केला आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळांवर मंकी पॉक्सच्या चाचण्या प्रवाशांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. मुंबईतील तपासणीचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेला पाठवले जातील.
मंकीपॉक्स या आजाराबद्दल
- मंकीपॉक्स हा एक व्हायल आजार आहे. हा आजार संसर्गजन्य प्राण्यापासून इतर प्राण्याला तसेच माणसाला होतो.
- तोंड, नाक, डोळ्यांतून मंकी पॉक्सचा व्हायरस माणसाच्या शरीरात प्रवेश करतो.
- मंकीपॉक्स माणसाच्या शरीरावर कांजण्यासारख्या खूणांसारखा आढळतो. या आजाराने मोठी बाधा होत नाही. पसाराचा वेगही कांजण्यांच्या तुलनेत कमी आहे.
- माणसाच्या शरीरावरील जखमेतूनही मंकी पॉक्स शरीरात पसरतो.
- ताप, त्वचेवर चट्टे येणं आणि शरीरावरील ग्रंथी सुजणे यासारखी लक्षणं यात आढळून येतात.
- शरीरावरील लक्षणे किमान दोन आठवडे राहतात.