आरोग्यविषयक समस्यांच्या निराकरणासाठी चर्चासत्राचे आयोजन

119

कोरोनाकाळानंतर आरोग्य क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा मोठा प्रश्न उभा राहिला. कोरोनाकाळात सार्वजनिक आरोग्य विभागाने अतिशय चांगले काम केले. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्याची आवश्यकता आहे. सरकारकडून त्याकरिता आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

( हेही वाचा : राज्यात १२ हजार ६०० पदांसाठी पोलीस भरती! )

आरोग्यविषयक आणीबाणी काळात या क्षेत्रासमोरील अनेक आव्हाने उभी राहिली. याबाबतीत गुरुवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या अक्ष्यक्षतेखाली एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात आली. या चर्चासत्राला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आरोग्य खात्याविषयी भरीव तरतूद करण्यात आली आहे. यापुढेही आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल, असेही ते म्हणाले.

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. अलिकडेच पाच ते सहा जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास सरकारने मंजुरी दिली. त्याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात महाविद्यालय उभारणीसाठी नियोजन सुरु असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी अधिक सुलभ होणार

या परिषदेला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही हजेरी लावली. गरिबांना रुग्णालयीन सेवा मिळवण्यासाठी सरकारकडून सुरु असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजेनची अंमलबजावणी प्रभावशाली होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती टोपे यांनी दिली. धर्मादाय रुग्णालयांत या योजनेसाठी तीस टक्के खाटा उपलब्ध होतील, यादृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.