गड-किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवून त्यांचे संवर्धन करण्याच्या मागणीसाठी ३ मार्चला राज्यव्यापी मोर्चा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचे रक्षण तसेच संवर्धन व्हावे आणि या गड-किल्ल्यांवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे या प्रमुख मागण्यांसाठी गड-दुर्ग प्रेमींच्या राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ३५ हून अधिक गडांवर अशा प्रकारची अतिक्रमणे आहेत. तसेच पुण्यातील लोहगड, मुंबईतील शिवडी, कुलाबा, माहीम आदी गडांवर अवैध दर्गे, थडगी आणि त्याभोवती संरक्षक भिंती बांधून इस्लामीकरण केले जात आहे आणि पुरातत्त्व विभागाचा गलथान कारभार, या संदर्भात दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, धनंजय शास्त्री वैद्य, मुंबई, ठाण्यासह रायगडमधील विविध गडप्रेमी आणि हिंदू संघटना संस्था उपस्थित होत्या.

( हेही वाचा : #Exclusive उद्धव गटाच्या आमदारांना तूर्त जीवदान; शिवसेना ‘व्हीप’ बजावणार नाही!)

महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीने या मोर्चाचे आयोजन दिनांक ३ मार्च २०२३ रोजी दुपारी १२ वाजता केले असून मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यानंतर आझाद मैदानावर सभा घेतली जाणार आहे. याचदरम्यान राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा आहे, त्यामुळे गड-किल्ले संवर्धनासाठी राज्यात स्वतंत्र महामंडळ असावे अशी मागणी या सभेतून करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गड-किल्ल्यांचे संवर्धन करून यावरील सर्व अतिक्रमणे हटवली जावीत हा यामागील प्रमुख उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

‘महाराष्ट्र गड-दुर्ग संवर्धन महामंडळ’ स्थापन करावे

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आहे. आपण या किल्ल्यांवर झालेल्या अतिक्रमणाविरोधात रस्त्यावर जोपर्यंत आपली ताकद दाखवत नाही तोपर्यंत कोणतेही सरकार लक्ष देणार नाही. आश्वासने मिळतील परंतु ही आश्वासने पूर्ण होतात की नाही यावर आपल्याला लक्ष ठेवावे लागणार आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ले हा पराक्रमाचा खरा इतिहास आहे असे सांगत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी सर्वांना या मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

३ मार्च रोजी गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणांविरोधातील मोर्चा ही फक्त सुरूवात आहे. आजची ही बैठक पुढच्या कृतीसाठी आहे. वर्तमान सरकारने ज्याप्रकारे प्रतापगडावरील अतिक्रमण हटवले त्याचप्रमाणे इतर गड-किल्ल्यांचे संवर्धन करणेही गरजेचे आहे. यादरम्यान स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी अशी मागणी करण्यात येणार आहे आणि या मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट यांनी दिली.

महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत…

  • राज्यातील सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमणे ठराविक वेळमर्यादा घालून हटवा.
  • गड-किल्ल्यांवर अतिक्रमणास कारणीभूत असलेले दोषी पुरातत्त्व विभागाचे व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून हानीभरपाई वसूल करावी.
  • गड-दुर्गांवर अतिक्रमण करणाऱ्यांचे पुनर्वसन शासकीय खर्चाने करू नका.
  • ‘महाराष्ट्र गड-दुर्ग संवर्धन महामंडळ’ स्थापन करून गड-दुर्गांचे संवर्धन करा.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here