गड-किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी राज्यव्यापी मोर्चा! पूर्वतयारीसाठी २१ फेब्रुवारीला बैठक

114

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचे रक्षण तसेच संवर्धन व्हावे आणि या गड-किल्ल्यांवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे या प्रमुख मागण्यांसाठी गड-दुर्ग प्रेमींच्या राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील विशेषत: मुंबई, ठाणे आणि रायगडमधील विविध गडप्रेमी संस्था उपस्थित राहणार आहेत.

( हेही वाचा : फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी पहाटे नाही तर ‘या’वेळेत झाला; भगतसिंह कोश्यारींनी स्पष्टच सांगितलं…)

गड-किल्ले संवर्धनासाठी राज्यात स्वतंत्र महामंडळ असावे

महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीने या मोर्चाचे आयोजन दिनांक ३ मार्च २०२३ रोजी केले असून मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यानंतर आझाद मैदानावर सभा घेतली जाणार आहे. याचदरम्यान राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा आहे त्यामुळे गड-किल्ले संवर्धनासाठी राज्यात स्वतंत्र महामंडळ असावे अशी मागणी या सभेतून करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गड-किल्ल्यांचे संवर्धन करून यावरील सर्व अतिक्रमणे हटवली जावीत हा यामागील प्रमुख उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीचे निमंत्रक सागर चोपदार यांनी दिली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

  • मंगळवार, २१ फेब्रुवारी २०२३
  • आयोजक : महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती
  • संपर्क : 8080208958
  • स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर (प.)
  • वेळ : सायंकाळी ७:०० वाजता
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.