महाराष्ट्रातील लातूर शहरात 13 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित 70 फूट “स्टॅच्यू ऑफ नॉलेज” चे अनावरण होणार आहे. स्थानिक खासदाराने ही माहिती दिली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि रामदास आठवलेदेखील उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) स्थानिक खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या परिसरात हा पुतळा उभारण्यात आला आहे. डॉ.आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या एक दिवस अगोदर अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
यांची असणार उपस्थिती
13 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या पुतळ्याच्या अनावरण समारंभाला कायदा मंत्री किरेन रिजिजू आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
( हेही वाचा: महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचा-यांचे शोषण केले… )
20 दिवसांत उभारला जाणारा जगातील पहिला पुतळा
श्रृंगारे यांनी सांगितले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. पुतळ्याच्या उभारणीसाठी 35 कलाकारांचे पथक अहोरात्र कार्यरत आहे. हा पुतळा फायबरपासून बनवण्यात आला आहे. अक्षय हलके या कलाकाराने दावा केला की, डॉ. आंबेडकरांचा 20 दिवसांत उभारला जाणारा जगातील हा पहिलाच पुतळा आहे.
Join Our WhatsApp Community