हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा असलेल्या महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली. या महाकुंभमेळ्यामध्ये ॲपल कंपनीचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल (Laurene Powell) ह्या सहभागी झाल्या आहेत. दरम्यान, स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांनी कमला हे हिंदू नाव धारण केले आहे. तसेच त्यांच्या गुरूंनी आपले गोत्र प्रदान केले आहे. लॉरेन पॉवेल यांच्या भारत दौऱ्याबाबत माहिती देताना त्यांचे आध्यात्मिक गुरू स्वामी कैलाशानंदजी महाराज यांनी सांगितले की, आम्ही लॉरेन पॉवेल (Laurene Powell) यांना कमला हे हिंदू नाव दिले आहे. त्या इथे आपल्या गुरुजींना भेटण्यासाठी आल्या आहेत.
(हेही वाचा महा कुंभ २०२५ मेळ्यांमध्ये Coca-Cola India सज्ज; दर ४०० मीटर्सच्या अंतरावर उत्पादने उपलब्ध)
लॉरेन पॉवेल आमच्यासाठी मुलीसारख्या आहेत. त्या दुसऱ्यांदा भारताल आल्या आहेत. त्या खाजगी कार्यक्रमासाठी आल्या असून, त्या काही दिवस येथे कल्पवास करतील. स्वामी कैलाशानंद महाराज यांनी पुढे सांगितले की, लॉरेन पॉवेल (Laurene Powell) यांना सनातन धर्मामध्ये रुची आहे. तसेच त्यांना अच्युत हे गोत्र देण्यात आले आहे. लॉरेन ह्या ध्यान धारण करण्यासाठी भारतात आल्या आहेत. जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबातील सदस्यांपैकी एक असलेल्या लॉरेन ह्या कुंभमेळ्यादरम्यान त्या संन्याशाप्रमाणे राहत आहेत. पहिले अमृतस्नान करण्यासाठी त्यांची तयारी होती परंतु त्यांची प्रकृती बिघडली, त्यामुळे त्या नंतर अमृत स्नान करणार आहेत, अशी माहिती महामंडलेश्वर स्वामी कैलाानंद यांनी दिली. लॉरेन पॉवेल (Laurene Powell) या त्यांचे गुरू आणि निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी कैलाानंद यांच्या शिबिरात राहत आहेत.
Join Our WhatsApp Community