दहिसरमध्ये BEST बसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी; काय आहे प्रकरण?

मुंबई पश्चिम उपनगरातील दहिसर पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील हॉटेल पायलजवळ एका बेस्टवर दगडफेक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. या ठिकाणी प्रवाशांनी भरलेल्या बेस्ट बसवर दगडफेक झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही उनाड तरूणांनी बेस्टवर बसवर जोरदार दगडफेक केली आहे. या दगडफेकीत बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून या घटनेत बसचे मोठे नुकसान देखील झाले आहे.

(हेही वाचा – मुंबईत गोवरचा दुसरा बळी, पालिका आरोग्य विभागासमोर आव्हान कायम)

दरम्यान, दहिसर चेक नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या बेस्ट बसवर या तरूणांनी सोमवारी रात्री ही दगडफेक केली. या घटनेप्रकरणी या तरूणांविरोधात दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींना शोधण्याचे काम देखील पोलिसांकडून सुरू आहे.

प्रवाशांना घेऊन निघालेली बेस्ट बस दहिसर टोल नाक्याच्या दिशेने जात असताना एका कारला या बसची किरकोळ धडक बसली. मुंबईतील दहिसर पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर पायल हॉटेल आहे. या हॉटेलजवळ बेस्ट बसची या कारला ही धडक बसली. यानंतर सहा ते सात जणांनी बसवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. बसच्या समोरील काचा आणि खिडक्यांच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत. या दगडफेकीत अनेक प्रवाशांना दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here