वरळीतील गांधीनगर परिसरात एका काम सुरू असलेल्या इमारतीवरून अचानक दगड रस्त्यावर कोसळला. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील चौकशी सुरू आहे. ही बिल्डिंग फोर सिझन्स हॉटेलची असल्याची प्राथमिक माहिती आहे.
वरळीतील फोर सिझन्स रेसिडेन्सी या गगनचुंबी इमारतीच्या ४२ व्यामाजल्यावरून बांधकामाचे दगड कोसळून दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये अनेक वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटनास्थळी अग्निशमन दल, मनपाचे अधिकारी आणि ना.म.जोशी मार्ग पोलीस दाखल झाले आहेत. हॉटेल आणि बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला एकच दरवाजा आहे. सर्व रहदारी याच दरवाजाने होते. मृतांमध्ये इम्रान (20) व शब्बीर (25) यांचा समावेश आहे. ते सावी एक्सपोर्टसमध्ये काम करत होते.
(हेही वाचा मुंबई उपनगरला मिळाले नवे जिल्हाधिकारी, निधी चौधरी यांची बदली)
Join Our WhatsApp Community