POK ला आझाद काश्मीर म्हणणे बंद करा – केरळ राज्यपाल आरिफ मोहम्मद खान

कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांवर राज्यपालांची जाहीर नाराजी

289
POK ला आझाद काश्मीर म्हणणे बंद करा - केरळ राज्यपाल आरिफ मोहम्मद खान

कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी (POK) पाकव्याप्त काश्मीरला (पीओके) आझाद काश्मीर म्हणणे बंद करावे. हा प्रकार असंवैधानिक असून देशाच्या एकता आणि अखंडतेला धोका पोहचवण्याचे कृत्य असल्याची परखड टीका केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केली.

केरळमध्ये सरकार चालवत असलेले एलडीएफ आघाडीचे आमदार केटी जलील यांनी फेसबुक पोस्टमध्ये पीओकेचे आझाद काश्मीर असे वर्णन केले होते. मात्र, नंतर त्यांनी ती पोस्ट डिलीट केली. स्थानिक आरएसएस नेत्याने याबाबत पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यापार्श्वभूमीवर राज्यपालांनी परखड टीका करताना म्हंटले की, पीओकेला (POK) आझाद काश्मीर म्हणणे असंवैधानिक कृत्य आहे.

(हेही वाचा – Winter Sessions : आजपासून चढणार उपराजधानीचा राजकीय पारा)

राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (POK) आपल्या ८ विधेयकांवर स्वाक्षरी करत नसल्याचा आरोप केरळ सरकारने केला आहे. याबाबत सरकारने सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण प्रलंबित ठेवले आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून चर्चा करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने २९ नोव्हेंबरला म्हटले होते. या मुद्द्यावर खान म्हणाले की, माझ्या बाजूने हे विधेयक रोखले जात असल्याचे मला माध्यमातून कळले. परंतु ही विधेयके माझ्याकडे अडीच आठवड्यांपूर्वीच आली आहेत. सरकारला कोणत्याही विधेयकावर तातडीने स्वाक्षरी करायची असेल, तर राजभवनात येऊन मला सांगावे. माझ्याकडून कोणताही भेदभाव केला जाणार नाही. (POK)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.