युक्रेन संघर्ष आता थांबवा; मोदींचे पुतीन यांना आवाहन

सध्याचे युग हे युद्धाचे नाही असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमधील संघर्ष आता संपुष्टात आणा, असे आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना केले आहे. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनची यंदाची वार्षिक परिषद उझबेकिस्तानमधील समरकंद शहारत आयोजित करण्यात आली आहे. त्या परिषदेला उपस्थित असलेल्या मोदी व पुतीन यांची शुक्रवारी भेट होऊन त्यांच्यात सुमारे पन्नास मीनिटे चर्चा झाली.

मोदी यांनी पुतीन यांना सांगितले की, जागतिक स्तरावर अन्न व ऊर्जा सुरक्षेसंदर्भात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अन्नसुरक्षा, इंधन, खते आदींचा मोठा प्रश्न विकसनशील देशांसमोरही उभा राहिला आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. पुतीन यांनी यासाठी पुढाकार घ्यावा.

( हेही वाचा: प्रबोधनकार हिंदू धर्माभिमानी होते; आजोबांचे विचार वाचा म्हणणाऱ्यांना राज ठाकरेंचे प्रत्युत्तर )

त्यावर पुतीन यांनी मोदींना सांगितले की, युक्रेनच्या संघर्षाबद्दल भारताला वाटणा-या चिंतेविषयी मला कल्पना आहे. हा संघर्ष लवकरात लवकर संपुष्टात यावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. रशियाही त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे. रशियाबरोबर चर्चेच्या प्रक्रियेत सहभागी होण्यास युक्रेनने नकार दिला आहे. त्यांना लढाईच्या माध्यमातूनच आपली उद्धिष्ट्ये साध्य करायची आहेत. युक्रेनमध्ये जे घडत आहे, त्याची सारी माहिती रशिया सर्वांना वेळोवेळी देईल, असेही पुतीन म्हणाले.

अद्याप निषेध नाही

रशियाला एकटे पाडण्याच्या प्रयत्नात भारत सामील नसल्याबद्दल रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी प्रशंसा केली होती. युक्रेन युद्धाबाबत भारताने रशियाचा निषेध केलेला नाही. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी व पुतीन यांची समरकंद येथे भेट व चर्चा झाली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here