बापरे! कोरोनाच्या ५० हजार लसी जाणार वाया…पण का?

108

देशात कोरोनाचा कहर नियंत्रणात आला असला तरी कोरोना लसीकरण मोहीम सुरूच आहे. मात्र कोरोना लसीकरण मोहीमेदरम्यान, एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ती बातमी म्हणजे मुंबईतील तीन खासगी रुग्णालयांमधील कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या साठ्याची मुदत लवकर संपुष्टात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुदत संपणार असून या लसी मात्र बदलून द्याव्यात, याकरिता खासगी रुग्णालय प्रशासनाने राज्याच्या आरोग्य विभाग आणि मुंबई पालिकेला लेखी निवेदन दिले आहे. मुदत संपायला येणाऱ्या ५० हजारांहून अधिक लस मात्रा घेऊन त्या बदल्यात नवा साठा खासगी रुग्णालयांना देण्यात यावा, असे यात म्हटले आहे.

लससाठा एक दोन महिन्यांत कालबाह्य

मुंबईच्या अंधेरी येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाकडे १५ ते १६ हजार कोरोन लस मात्रा आहेत. त्यांची मुदत मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे. तर मुलुंड व बोरिवली येथील अॅपेक्स रुग्णालय समूहाकडे १० हजार लस मात्रा असून त्यांची मुदत ५ मार्चला संपणार आहे. तसेच शहर उपनगरातील खासगी रुग्णालयांकडील बराचसा लससाठा हा एक दोन महिन्यांत कालबाह्य होणार आहे. शहर उपनगरांतील खासगी रुग्णालयांमधील जवळपास दोन लाख लस मात्रांचा साठा जून २०२२ मध्ये कालबाह्य होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

(हेही वाचा – “… हे राजकारण देशाला परवडणार नाही; राज्य आणि देश खड्ड्यात जाईल” )

लसीकरण केंद्रावर जागा देण्यास तयार

दरम्यान, तांत्रिक कारणांमुळे खासगी रुग्णालयांना पालिका लससाठा बदलून देऊ शकत नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. यावर तोडगा म्हणून खासगी रुग्णालयांना महापालिका प्रशासन लसीकरण केंद्रावर जागा देण्यास तयार असून त्यांनी सीएसआरअंतर्गत या ठिकाणी लसीकरण मोहीम राबवावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.