अमेरिकेत आलेल्या भीषण वादळामुळे हवाई सेवेवर मोठा परिणाम झाल्याचे समोर येत आहे. या ठिकाणी वारंवार येणाऱ्या वादळामुळे अनेक शहरांतील फ्लाईट (उड्डाणे) रद्द करण्यात आली आहे. खराब हवामानामुळे सलग दुसऱ्या दिवशी हजारो उड्डाणे रद्द कऱण्यात आली आहे. FlightAware च्या मते, हवामान इतके खराब असल्यामुळे शुक्रवारी ६ हजाराहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. तर काही उशिराने उड्डाण केले.
(हेही वाचा – केतकी चितळेवर कारवाई, मग शेख हुसेन यांच्यावर का नाही? भाजपचा सवाल)
विमानतळांवर विमानांची गर्दी
यापूर्वी गुरुवारी १७०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती तर ८८०० हून अधिक उड्डाणे उशिराने झाली होती. अमेरिकेत मिसिसिपी ते व्हर्जिनियापर्यंत चक्रीवादळे येत आहेत. त्यामुळे अटलांटा, शेर्लोट, वॉशिंग्टन, डीसी आणि न्यूयॉर्क येथील विमानतळांवर विमानांची गर्दी झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा पुन्हा प्रसार झाल्यामुळे मोठ्या संख्येने एअरलाइन्स कर्मचारीही उपस्थित नसल्याचे सांगितले जात आहे.
सर्वाधिक विमानांना वादळाचा फटका
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी एअरलाइन्सने अमेरिकेतील १,५०० हून अधिक उड्डाणे रद्द केली होती. न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर एक तृतीयांशपेक्षा जास्त उड्डाणांना वादळाचा फटका बसला. न्यू जर्सीजवळील नेवार्क लिबर्टी विमानतळावर एक चतुर्थांशहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर, काही आठवड्यांपूर्वी एअरलाइन्सने मेमोरियल डे वीकेंडच्या आसपास पाच दिवसांच्या कालावधीत सुमारे २,८०० उड्डाणे रद्द केली होती.
Join Our WhatsApp Community