Invention of Saxophone: ‘अडॉल्फ सॅक्स’ नावाचा अद्भूत मानव, ज्याने केली सॅक्सोफोनची निर्मिती

त्याच्या जन्म गावी तर त्याच्या स्मरणार्थ संगीतवाद्यांचं संग्रहालत बांधण्यात आलं आहे. या संग्रहालयाचं नाव आहे ’मिस्टर सॅक्स हाऊस

241
Invention of Saxophone: 'अडॉल्फ सॅक्स' नावाचा अद्भूत मानव, ज्याने केली सॅक्सोफोनची निर्मिती
Invention of Saxophone: 'अडॉल्फ सॅक्स' नावाचा अद्भूत मानव, ज्याने केली सॅक्सोफोनची निर्मिती

संगीत म्हणजे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग. अगदी लोक जंगलात राहत होते तेव्हाही त्यांचे स्वतःचे असे संगीत होते, नृत्य होते. आपण यास वनवासी नृत्य वगैरे म्हणतो. पुढे पुढे संगीत प्रगत होत गेलं. नवनवीन वाद्ये निर्माण झाली. आज आम्ही तुम्हाला सॅक्सोफोन निर्माण करणार्‍या अवलियाची माहिती सांगणार आहोत. जुन्या हिंदी चित्रपटांत सॅक्सोफोन हे वाद्य असायचं म्हणजे असायचंच. हे वाद्य अडॉल्फ सॅक्स या अवलियाने तयार केलं आहे. (Invention of Saxophone)

अडॉल्फ सॅक्सचा जन्म १८१४ मध्ये बेल्जीयमधील दिनांत या छोट्या शहरात झाला. वडिलांचं नाव चार्ल्स आणि आईचं नाव मेरी. हे दांपत्य वाद्य निर्मिती या क्षेत्रा होते. त्यामुळे अडॉल्फचं बालपण अशाच वातावरणात गेलं. अडॉल्फ हा खोडकर, मस्तीखोर आणि उचापती करणारच मुलगा होता. त्याच्या या विचित्र कलाकारीमुळे मुलं त्याला लहान भूत म्हणायचे. मात्र लहानपणासून वडिलांच्या कार्यशाळेत तो काम करत असल्यामुळ त्याची वाद्यांशी मैत्री झाली.

वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने बासरी आणि सनई बनवली होती. हळूहळू तो पालकांच्या उद्योगात उतरला. ’रॉयल कॅजर्वेटरी ऑफ ब्रुसेल्स’ या संस्थेत तो शिक्षण घेत होता. २४ व्या वर्षी त्याने सनई बनवली, त्याचं पेटंट घेतलं आणि पॅरिसला स्थायिक झाला. पुढे त्याने ऑपेरा बॅंड सुरु केला. लवकरच त्याचा हा बॅंड प्रसिद्ध झाला.

आज आपण बॅंड पथकात जी वाद्ये पाहतो, जसे की सनई, बासर्‍या, बिगुल या सर्वांना नवं रुप अडॉल्फने दिलं आहे. त्याने वाद्यांवर अनेक प्रयोग केले. १८४१ रोजी त्याने एका सुप्रसिद्ध संगीतकारासमोए सॅक्सोफोनचं सादरीकरण केलं. त्या संगीरकाराला हा प्रकार खूपच आवडला. १९४६ साली सक्सोफोनची अधिकृत घोषणा झाली. त्याच्याच नावावरुन या वाद्याचे नाव ठेवण्यात आले. शॅक्सोफोन हा प्रकार भारतातही खूप चालला. जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये तर या वाद्याने कमाल करुन दाखवलेली आहे. अडॉल्फ सॅक्स या अलवियाने ऑर्केस्ट्रा, बॅंड आणि संगीत क्षेत्रात प्रचंड क्रांती घडवून आणली आहे. त्याच्या जन्म गावी तर त्याच्या स्मरणार्थ संगीतवाद्यांचं संग्रहालत बांधण्यात आलं आहे. या संग्रहालयाचं नाव आहे ’मिस्टर सॅक्स हाऊस’.(Invention of Saxophone)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.