बालविवाहाच्या विरोधात लढा देणारी खंबीर महिला Dr. Rakhmabai Raut

334

रखमाबाई राऊत (Dr. Rakhmabai Raut) ह्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. रखमाबाई यांचा जन्म २२ नोव्हेंबर १८६४ रोजी मुंबई येथे झाला. ११ वर्षांच्या रुखमाबाईचा विवाह १९ वर्षांच्या दादाजी भिकाजीशी झाला. तो तिच्या सावत्र वडिलांचा चुलत भाऊ होता. भिकाजीने तिचे शिक्षण बंद करून तिला आपल्यासोबत राहण्यास भाग पाडले.

अशी बळजबरी केल्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. १८८४ मध्ये तिच्या पतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली कारण रखमाबाई त्याच्यासोबत राहत नव्हती. त्यानंतर न्यायालयाने रखमाबाईंना एकतर पतीसोबत राहण्यास किंवा तुरुंगात जाण्यास सांगितले. रखमाबाईंनी (Dr. Rakhmabai Raut) उत्तर दिले की “पतीसोबत राहण्यापेक्षा तुरुंगात राहणे चांगले आहे.” १८८८ मध्ये ती कायदेशीररित्या आपल्या पतीपासून विभक्त झाली आणि नंतर वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेली. लंडन स्कूल ऑफ मेडिसिनमधून त्यांनी वैद्यकीय पदवी प्राप्त केली.

(हेही वाचा National Herald : यंग इंडियाची 751.9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; सोनिया-राहुल गांधींची ७६ टक्के भागीदारी)

१८८४ ते १८८८ दरम्यान त्यांनी बालविवाहाविरुद्ध लढा दिला. हे प्रकरण खूप गाजले. ज्यात कायदा विरुद्ध परंपरा, सामाजिक सुधारणा विरुद्ध पुराणमतवाद आणि स्त्रीवाद असा वाद उभा राहिला. त्यांनी इंग्लंडच्या राणीला पत्र लिहून या कायद्याबाबत विचार करायला सांगितले. या काळात रुखमाबाईंनी (Dr. Rakhmabai Raut) आपले शिक्षण सुरुच ठेवले. त्यांच्या लढ्याला अनेक लोकांचे समर्थन प्राप्त झाले.

पुढे त्या लंडन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये गेल्या. त्यासाठी त्यांनी निधी देखील मिळवला. १८९५ मध्ये त्या पदवीधर झाल्या आणि भारतात आल्या. त्या आनंदीबाई जोशी यांच्या नंतर पहिल्या महिला डॉक्टरांपैकी एक होत्या आणि सुरतमधील महिला रुग्णालयात काम करू लागल्या. त्यांच्या योगदानासाठी इंटरनेट सर्च कंपनी गुगल इंडियाने २२ नोव्हेंबर २०१७ रोजी रखमाबाई राऊत यांच्या १५३ व्या वाढदिवसानिमित्त डूडलद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.