एसटी कर्मचाऱ्यांसाठी विद्यार्थीच बनले आंदोलक!

विद्यार्थी आणि ग्रामीण प्रवाशांचा सहभाग

123

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी आज सावंतवाडीतील एसटी कर्मचारी, नागरीक, विद्यार्थी व प्रवाशांनी मोर्चा काढला. यावेळी एसटी कर्मचार्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, त्याच बरोबर तात्काळ एसटी बस सुरू करण्यात यावी, अशा विविध घोषणा देत एसटी कर्मचाऱ्यांसाठी विद्यार्थीच आंदोलक बनले आहेत. याबाबतचे निवेदन तहसिलदारांना पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. दरम्यान सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शविला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या…

सावंतवाडी बसस्थानकापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि प्रवासी मोठ्या प्रमाणत सहभागी झाले होते. या मोर्चा दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ग्रामीण भागातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तात्काळ बसफेऱ्या चालू करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तर सीमेवर ज्याप्रमाणे सैनिक डोळ्यात तेल घालून संपूर्ण भारतीय जनतेचे रक्षण करतात, त्याचप्रमाणे एसटी कर्मचारी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी रात्रंदिवस मेहनत घेऊन प्रामाणिक काम करीत आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचारी, अधिकारी व आमदार, मंत्री यांनी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हेही वाचा – ‘लालपरी’च्या सेवेतून ११ कर्मचारी बडतर्फ, २५७ जणांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

 उत्तर न देणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना बडतर्फ 

एसटी महामंडळाचे विलिनीकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. मात्र दुसरीकडे महामंडळाकडून आतापर्यंत २५७ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याला उत्तर न देणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. बुधवारी २७ एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याच्या दृष्टीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे नोटीस बजावण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या २५७ झाली आहे. एसटीतील १११ कर्मचाऱ्यांना बुधवारी निलंबित करण्यात आले

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.