ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थी आक्रमक; विद्यार्थ्यांचा शिक्षणमंत्र्याच्या घराला घेराव

94

इयत्ता दहावी आणि बारावी विद्यार्थी परीक्षा ऑनलाईन घ्यावे या मागणीसाठी मुंबईत विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहे. केवळ मुंबईच नाही तर नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद येथे विद्यार्थी याच मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. यासह धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घेराव घातला. विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेला विरोध दर्शवत गदारोळ केला. यावेळी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, याकारणाने परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.

धारावीत विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेसाठी आक्रमक

मुंबईत विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्याच्या घराला घेराव घालत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या काही दिवसांपूर्वी परीक्षा ऑफलाईनच होणार असे शिक्षणमंत्र्यांकडून सांगण्यात आल्यानंतर आज विद्यार्थ्यी त्याविरोधात आक्रमक झाले आहेत. शाळा ऑनलाईन असताना परीक्षा ऑफलाईन का? असा आक्रमक सवाल आंदोलक विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. दरम्यान, ऑनलाईन परीक्षेच्या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून, बसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. धारावीपरिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थी सकाळपासूनच जमले आहेत. यंदा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी, अशी त्यांची मागणी असून कालच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ऑफलाईन आणि वेळापत्रकानुसार होणार असल्याचे सांगितले होते. परंतु हा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नाही. याप्रकरणी सोशल मीडियावर देखील विद्यार्थ्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटतांना दिसताय.

(हेही वाचा – विद्यार्थ्यांचे आंदोलन! परीक्षा ऑनलाईन घ्या… दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची मागणी)

भाजपचा सरकारवर जोरदार निशाणा

या आंदोलनावरून भाजपने सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे, या राज्यात लोकशाही राहिलेली नाही, मनाला येईल तेव्हा लाठीमार, मनाला येईल तेव्हा जेलमध्ये टाकायचं, मनाला येईल तेव्हा गुन्हे दाखल करायचे, असा धंदा सरकारकडून सुरू असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले आहे. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचं पाप हे सरकार करतंय अशी टीका दरेकरांनी केली आहे. यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, असेही दरेकर म्हणाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.