विद्यार्थ्यांनी पुस्तकापर्यंत मर्यादित न राहता कला- क्रीडा क्षेत्रात विकास करावा- आश्विनी भिडे

सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकांपर्यंत मर्यादीत न राहता कला-क्रीडा गुणांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन अतिरिक्त  आयुक्त (पूर्व उपनगरे)  आश्विनी भिडे, यांनी केले.
 
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ‘इंद्रधनुष्य २०२३’ हा कला आणि क्रीडा आविष्कारांचा भव्य व देखणा असा सांस्कृतिक सोहळा रविवार ५ मार्च २०२३ तोजी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलातील सरदार वल्लभाई पटेल डोम स्टेडियम येथे संपन्न झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या सोहळ्यात . या सोहळ्यास शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री  दीपक केसरकर राज्याचे पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री  मंगलप्रभात लोढा, आमदार  राजहंस सिंह,  सहआयुक्त (शिक्षण) (अतिरिक्त कार्यभार) अजित कुंभार, सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय)  चंद्रशेखर चोरे, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन)  सुनील धामणे, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन)  चंदा जाधव, सहायक आयुक्त (एम पश्चिम) विश्वास मोटे, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजेश तडवी, माजी उप आयुक्त (शिक्षण)  केशव उबाळे, प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक यांच्यासह इतर मान्यवर, महानगरपालिकेचे विविध अधिकारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
 
 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना त्या म्हणाल्या की, महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सन २०२० मध्ये शिक्षण विभागाच्या माध्यमातून ‘रायजिंग स्टार’ हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर, कोविड-१९ प्रादुर्भावामुळे या आयोजनात खंड पडला. आता तीन वर्षांनी ‘इंद्रधनुष्य २०२३’ च्या भव्य व देखण्या रुपाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुन्हा सुरुवात होते आहे. महानगरपालिकेच्या शाळांमधून सर्व स्तरातील मिळून सुमारे ४ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षण घेता यावे, यासाठी शैक्षणिक सोयी-सुविधा विनामूल्य पुरविल्या जातात. मात्र त्यापेक्षा सर्वाधिक भर आहे तो सर्वोत्कृष्ट शिक्षण देण्यावर, यामुळेच विद्यार्थ्यांचे कला आणि क्रीडा गुण यांनाही प्रोत्साहन देण्याचे शिक्षण विभाग करतो. आताच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकांपर्यंत मर्यादीत न राहता कला-क्रीडा गुणांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहनही  भिडे यांनी केले.
 
 

समाजात मानाचे स्थान आहे असे निवडक १०० माजी विद्यार्थी होते उपस्थित…

महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेऊन ज्यांनी यशाचे उच्च शिखर गाठून समाजामध्ये मानाचे स्थान मिळविले आहे, असे महानगरपालिका शाळेतील १०० माजी विद्यार्थी, मागील तीन वर्षात महानगरपालिका शाळांमध्ये माध्यमिक शालांत (१० वी) परीक्षेमध्ये सर्वाधिक गुणसंपादन केलेले ७५ विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्राशी संबंधित बिगर शासकीय संस्थांचे प्रतिनिधी देखील या सोहळ्यास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  किसन पावडे यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here