सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी,
बूढ़े भारत में भी आई फिर से नयी जवानी थी,
गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी,
दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी।
चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥
ही कविता तुम्ही बर्याचदा ऐकली असेल, वाचली असेल, म्हटली असेल. पण तुम्हाला माहिती आहे का? ही कविता कोणी लिहिलीय ती? आज आम्ही तुम्हाला या कवयित्रीची माहिती सांगणार आहोत. या कवयित्रीचं नाव आहे सुभद्रा कुमारी चौहान… (Subhadra Chauhan)
सुभद्रा चौहान यांचा जन्म उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील निहालपूर गावात १६ ऑगस्ट १९०४ रोजी एका राजपूत कुटुंबात झाला. त्यांनी प्रयागराज येथील क्रॉस्थवेट मुलींच्या शाळेत शिक्षण घेतले. १९१९ मध्ये त्यांनी माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण केली. (Subhadra Chauhan)
(हेही वाचा- ISRO: आता भारताला ऐकू येणार पृथ्वीच्या हृदयाचे ठोके, इस्रो काय सरप्राईज देणार?)
१९१९ मध्ये खांडवा येथील ठाकूर लक्ष्मण सिंह चौहान यांच्याशी त्यांचा विवाह झाला. तेव्हा त्या फक्त सोळा वर्षांच्या होत्या आणि त्यांना पाच मुले होती. त्या उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या सदस्य होत्या. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात देखील भाग घेतला होता. (Subhadra Chauhan)
सुभद्रा ह्या उत्कृष्ट कवयित्री होत्या. त्यांनी बालसाहित्य देखील निर्माण केले आहे. तसेच मध्यमवर्गीयांच्या जीवनावर त्यांनी लघुकथा लिहिल्या आहेत. खिलौनेवाला, त्रिधारा, मुकूल, यह कडंब का पेड़ ही त्यांची काव्यसंग्रह आहेत. हिंगवाला नावाने त्यांनी लघुकथा संग्रह देखील प्रकाशित केला आहे. मात्र झांशीच्या राणीवर लिहिलेली त्यांची कविता सर्वात जास्त गाजली. (Subhadra Chauhan)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community