Subhash Chandra Bose : ’तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा’ ही अजरामर घोषणा देणारे सुभाषचंद्र बोस

Subhash Chandra Bose : २०१८ मध्ये आझाद हिंद सरकारला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. २३ जानेवारी २०२१ ही नेताजींची १२५ वी जयंती भारत सरकारद्वारे शौर्य दिन म्हणून साजरी करण्यात आली.

174
Subhash Chandra Bose : ’तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा' ही अजरामर घोषणा देणारे सुभाषचंद्र बोस
Subhash Chandra Bose : ’तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा' ही अजरामर घोषणा देणारे सुभाषचंद्र बोस

सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) ज्यांना आपण नेताजी म्हणून ओळखतो. ते कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक होते. दुसर्‍या महायुद्धादरम्यान त्यांनी इंग्रजांना भारतातून हद्दपार करण्यासाठी जपानच्या मदतीने आझाद हिंद सेनेची (Azad Hind Sena) स्थापना केली. सुभाषबाबूंनी दिलेला “जय हिंद” चा घोष हा राष्ट्रीय घोष झाला. त्याचबरोबर ’तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा.” ही त्यांची घोषणाही जगप्रसिद्ध झाली. आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. २३ जानेवारी १८९७ रोजी ओडिशाच्या कटक शहरात त्यांचा जन्म झाला.

(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir : थंडीच्या कडाक्यातही रामललाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी)

मृत्यूचं गूढ अजूनही कायम

सुभाषबाबूंचं आयुष्य खूपच रहस्यमय होतं. कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना खुल्या मनाने येता आलं नाही. अर्थात त्यांच्या मृत्यूचं गूढ अजूनही उलगडलेलं नाही. मात्र १९४५ ला त्यांचा मृत्यू झाला असं म्हटलं जात असलं तरी त्याबाबत अनेक प्रश्नचिन्ह आहेत. १६ जानेवारी २०१४ रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने (Calcutta High Court) नेताजींच्या बेपत्ता होण्याच्या गूढतेशी संबंधित गुप्त दस्तऐवज सार्वजनिक करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकांच्या सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. असो.

(हेही वाचा – Babri slogans at Jamia Millia : राममंदिरात प्राणप्रतिष्ठापना होत असतांना जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठात बाबरीसाठी घोषणा)

भारत सरकारद्वारे शौर्य दिन घोषित

जरी कॉंग्रेसने त्यांना अस्पृश्य मानले असले, तरी प्रथमच २०१८ मध्ये आझाद हिंद सरकारला (Government of Azad Hind) ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. २३ जानेवारी २०२१ ही नेताजींची १२५ वी जयंती भारत सरकारद्वारे शौर्य दिन म्हणून साजरी करण्यात आली. ८ सप्टेंबर २०२२ रोजी राजपथावर नेताजींच्या विशाल पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यानिमित्त राजपथाचे नाव कर्तव्य पथ (Kartavya Path) करण्यात आले. (Subhash Chandra Bose)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.