शुभांगिनी सांगळे मूळच्या नगरच्या. बारावीपर्यंत त्यांनी नगरमध्येच शिक्षण पूर्ण केले. त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. त्यांनी बारावीनंतर पुण्याला जाऊन इंजिनियरिंग केले. तेव्हा त्यांच्या डोक्यात हेच होते की चांगल्या पगाराची नोकरी मिळेल आणि छान ऐशो-आराम जगता येईल. पण इंजिनियरिंग करताना त्यांचे लग्न ठरले आणि शेवटच्या वर्षाला असताना त्यांचे लग्न झाले सुद्धा. तेव्हा आयटी क्षेत्रात मंदी चालू होती. अनेक लोकांच्या नोकर्या जात होत्या.
मात्र शुभांगिनी ह्यांना घरात बसून राहणे मंजूर नव्हते. आयटी क्षेत्रात नोकरी करू शकल्या नाहीत पण आयटी कंपन्यात खाण्याचा व्यवसाय करण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. त्यांच्या पतीनाही त्यांची ही आयडीयाची कल्पना आवडली. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे शुभांगिनी हा व्यवसाय चांगला चालवू शकतील असा त्यांना विश्वास होता. आता व्यवसाय करायचा असेल तर त्याविषयीचा अभ्यास हवा. मग त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. इंजिनियरिंगच्या शिक्षणामुळे प्रेझेंटेशन कसे द्यायचे ह्याचे त्यांना ज्ञान होतेच. मग त्यांनी बर्याच आयटी कंपनीत फ़ूड प्रेझेंटेशन्स दिली. आयबीएम सारख्या कंपनीत त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
(हेही वाचा – केरळ स्टोअरीची दुसरी बाजू; पुण्याच्या विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ते दहशवादी प्रशिक्षण)
त्यांनी अगदी तीन बाय तीनच्या जागेत स्वीट कॉर्नचे काउंटर उघडले. कारण शिक्षण घेण्याच्या वेळेस त्या नेहमी स्वीट कॉर्न खायला जायच्या, त्यांना ते भयंकर आवडायचे. त्यामुळे ते बनवण्याचा त्यांना अनुभवही होता, सुरुवातीला त्यांच्याकडे दोन जण कामावर होते. त्या स्वतः झाडू मारण्यापासून, लोकांच्या ऑर्डर्स घेण्यापर्यंत सगळी कामे करायच्या. अगदी भांडी सुद्धा त्यांनी घासली आहेत. आता व्यवसाय सुरू करायचा तर भांडवल कुठून आणायचे? तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांचा दरवाजा ठोठावला. त्यांनी तिला वीस हजार रूपये दिले. हे वीस हजार त्यांनी पंधरा दिवसात परत सुद्धा केले. हळूहळू एका काउंटरचे दोन, तीन असे वाढवत दहा काउंटर केले. त्यांनी अंड्याच्या नवीन रेसिपीज शोधून काढल्या. आणि टेक महिंद्र मध्ये एग्ज डिलाइट्चे काउंटर सुरू केले. हळूहळू त्यांनी कॉन्टिनेंटल पदार्थही बनवायला सुरुवात केली.
तीन बाय तीनच्या जागेत त्यांच्या व्यवसायाची सुरुवात झाली होती पण आता त्यांचा व्यवसाय तीन हजार स्क्वेअर फ़ुटापर्यंत विस्तारला. आता बाहेरची कॉन्ट्रॅक्ट्स घ्यायला सुरुवात केली. आता त्यांचा व्यवसाय वीस हजार रुपयांपासून सुरू होऊन सात कोटींवर पोहोचला. जवळ जवळ तीनशे लोकांना त्यांनी रोजगार मिळवून दिलेला. शुभांगी सांगळे यांनी दाखवून दिले की, ठरवले की काहीही अशक्य नसते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community