पिपंरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आणि आयर्नमॅन अशी ओळख असणारे कृष्ण प्रकाश यांनी पुन्हा एकदा वेशांतर करुन कारवाई केली आहे. कृष्ण प्रकाश यांनी स्टींग ऑपरेशन करत, त्यांच्या नावाचा गैरवापर करणा-या आणि खंडणी मागणा-याला बेड्या ठोकल्या आहेत. हा आरोपी मुंबई पोलीस दलातील विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचाही गैरवापर करत होता. या प्रकरणी मुख्य आरोपी रोशन बागुल, गायत्री बागुल आणि पुजा माने यांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे नेमका प्रकार
एका हाॅटेलमध्ये साडेनऊच्या सुमारास रोशन बागुल या आरोपीला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बेड्या ठोकल्या. हा आरोपी कृष्ण प्रकाश आणि विश्वास पाटील यांचा विश्वासू असल्याचं सांगत, आम्ही जमिनीची अनेक प्रकरणे निकाली काढल्याचा दावा करत होता. तसेच, स्वत: ला सायबर क्राईमचा अधिकारी सांगत होता.
( हेही वाचा IND Vs SA Women’s: चुरशीच्या लढतीत साऊथ आफ्रिकेने मारली बाजी! भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात )
याआधीही वेशांतर करुन केलीय कारवाई
वेशांतर करुन आरोपीला बेड्या ठोकण्याची कृष्ण प्रकाश यांची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही त्यांनी वेशांतर करुन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. कृष्ण प्रकाश यांचे हे स्टींग ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर, त्यांनी केलेल्या वेशभूषेत फोटोसेशनही केले आणि कामगिरी फत्ते झाल्यावर आपल्या रुबाबदार मिशीला ताव द्यायलाही ते विसरले नाहीत.
Join Our WhatsApp Community