मुंबई महापालिकेच्या तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारल्यानंतर त्याठिकाणी आढळून आलेल्या बेकायदा मालमत्तानंतर आयकर विभागाच्यावतीने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनाही समन्स बजावले आहे. चहल यांना महापालिका आयुक्त म्हणून हे समन्स पाठवून मागील २०१८पासून स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावांमधील कंत्राट कामांची माहितीच आयकर विभागाने मागवली.
( हेही वाचा : मुख्यमंत्री म्हणतात, मला तुरुंगात टाका! )
आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना समन्स
मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांना घरी आयकर विभागाने धाड मारल्यानंतर तेथील बेनामी संपत्तीनंतर आयकर विभागाने ३ मार्च रोजी हे महापालिका आयुक्त म्हणून इक्बालसिंह चहल यांना समन्स बजावले होते. यामध्ये दहा मार्च रोजी त्यांना आयकर विभागाच्या कार्यालया उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार चहल हे आयकर विभागाच्या कार्यालयात उपस्थितही राहिले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र आता तब्बल २२ दिवसांनंतर चहल यांना पाठवण्यात आलेल्या समन्सची कॉपी सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.
आयकर विभागाने मागवली माहिती
या समन्समध्ये आयकर विभागाने महापालिकेचे काही कर्मचारी व महापालिकेचे कंत्राटदार यांच्याबाबतची माहिती मागवली आहे. यामध्ये काही कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह कंत्राटदारांचे पॅनकार्ड व आधार कार्ड क्रमांक मागवले आहेत. तसेच १ एप्रिल २०१८ पासून आजमितीस ज्या विकासकामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत आणि त्यांचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर केले आहे त्या सर्व मंजूर कामांची माहितीही मागवली आहे. त्यांना या कंत्राट कामांचे पैसे कसे देण्यात आले. तसेच एप्रिल २०१८पासूनच्या मंजूर कंत्राट कामांच्या समितच्या बैठकीचे इतिवृत्तही मागवले आहेत.
Join Our WhatsApp Community