Sunday Box Office : सॅम बहादूर आणि ॲनिमल यांत बॉक्स ऑफिसवर कुठला चित्रपट यशस्वी?

ॲनिमल ब्लॉकबस्टर तर सॅमबहादूर खर्च वसूल करण्यासाठी धडपडतोय. 

299
Sunday Box Office : सॅम बहादूर आणि ॲनिमल यांत बॉक्स ऑफिसवर कुठला चित्रपट यशस्वी?
Sunday Box Office : सॅम बहादूर आणि ॲनिमल यांत बॉक्स ऑफिसवर कुठला चित्रपट यशस्वी?
  • ऋजुता लुकतुके

ॲनिमल (Animal movie) ब्लॉकबस्टर तर सॅमबहादूर (Sam Bahadur movie) खर्च वसूल करण्यासाठी धडपडतोय. (Sunday Box Office)

देशातील बॉक्स ऑफिसवर सध्या रणबीर कपूरच्या ॲनिमलची (Animal movie) चलती आहे. मागच्या आठ दिवसांत चित्रपटाने ६५३ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला आहे. यातून या चित्रपटाला प्रेक्षकांनी तसंच सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी उचलून धरल्याचं दिसतंय. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने ३३७ कोटी रुपये जमा केले. तर प्रादेशिक स्तरावर ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. तेलगू भाषेतील डब सिनेमाने ३० कोटी रुपयांची कमाई केली. (Sunday Box Office)

दुसरीकडे विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या सॅमबहादूर (Sam Bahadur movie) या चरित्रपटानेही आठ दिवसांत ५३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चरित्रपटाच्या मानाने ही कमाईही चांगली मानली जात आहे. चित्रपटाने आपला खर्च पूर्ण केला आहे. चित्रपटाची भारतातील कमाई ४३ कोटी रुपयांची आहे. (Sunday Box Office)

(हेही वाचा – Pune: पुणे ते लोणावळा १० डिसेंबरला मेगाब्लॉक, कोणत्या उपनगरीय गाड्या रद्द; जाणून घ्या…)

सॅम बहादूर वि. ॲनिमल बॉक्स ऑफिस

सॅम बहादूर (Sam Bahadur movie) आणि ॲनिमल (Animal movie) हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी जागतिक स्तरावर प्रसारित झाले. विकी कौशल अभिमित सॅम बहादूर (Sam Bahadur) सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमी चालला असला तरी त्याला लोकांची चांगली पसंती मिळतेय. मेघना गुलजार या संवेदनशील दिग्दर्शकाचा सॅम बहादूर (Sam Bahadur movie) हा चित्रपट स्वतंत्र भारताचे सर्वोत्तम सेनानी मानले जाणारे सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यावर आधारित आहे आणि जाणकारांनी या सिनेमाला उचलून धरलं आहे. (Sunday Box Office)

याउलट संदीप रेड्डी वांगा यांचा ॲनिमल चित्रपट (Animal movie) हा बिग बजेट सिनेमा आहे आणि निर्मितीवर १०० कोटी रुपयांच्यावर पैसे खर्च झाले आहेत. संदीप यांच्याच कबीर खान या सिनेमात होती त्यापेक्षा जास्त हाणामारी आणि शिवराळ भाषेचा प्रयोग ॲनिमलमध्ये आहे आणि त्यासाठी या चित्रपटावर टीकाही झाली आहे. पण, पिटातल्या लोकांनी सिनेमा उचलून धरला आहे. (Sunday Box Office)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.