अभिमानास्पद! अंतराळवीर Sunita Williams यांची तिसऱ्यांदा ‘अवकाशभरारी’

132
अभिमानास्पद! अंतराळवीर Sunita Williams यांची तिसऱ्यांदा 'अवकाशभरारी'
अभिमानास्पद! अंतराळवीर Sunita Williams यांची तिसऱ्यांदा 'अवकाशभरारी'

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. सुनीता विल्यम्स अंतराळातील चाचणी मोहिमेवर नवं अंतराळयान उडवणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरल्या आहे. 58 वर्षीय सुनीता विल्यम्स यांनी 5 जून रोजी फ्लोरिडा येथील केप कॅनाव्हरल येथून नासाचे अंतराळवीर बॅरी ‘बुच’ विल्मोर यांच्यासोबत बोइंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केलं. (Sunita Williams)

(हेही वाचा –BMC : धोकादायक इमारती आणि संभाव्य दरड कोसळण्याच्या ठिकाणांवर तातडीने कार्यवाही )

बोईंग क्रू फ्लाईट टेस्ट (CFT) नावाचं मिशन नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्राम म्हणून सुरू करण्यात आलं आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर नियमित क्रू फ्लाईटसाठी स्टारलाइनर प्रमाणित करण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. हे मिशन यशस्वी झाल्यास, ते अंतराळवीरांना कक्षेतील प्रयोगशाळेत आणि तिथून नेण्यासाठी स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगननंतरचं स्टारलायनर हे दुसरं खाजगी अवकाशयान बनवेल. (Sunita Williams)

(हेही वाचा –Lok Sabha Election 2024: मंत्री Deepak Kesarkar यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप)

सुनीता विल्यम्स यांच्यासाठी हे उड्डाण कारकिर्दीतील आणखी एक मैलाचा दगड आहे. याआधी, सुनीता विल्यम्स यांनी 2006-2007 आणि 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर केलेल्या मोहिमेदरम्यान एका महिलेने सर्वाधिक स्पेसवॉक (7) आणि स्पेसवॉक टाईम (50 तास, 40 मिनिटं) करण्याचा विक्रम केला होता. (Sunita Williams)

(हेही वाचा –Lok Sabha Elections : ‘ईव्हीएम’चा मुद्दा गेला बासनात!)

स्टारलायनर कॅप्सूल लिफ्टऑफनंतर सुमारे 26 तासांनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी डॉक करण्याचा प्रयत्न करेल, सुनीता विल्यम्स, विल्मोर आणि ऑर्बिटिंग आउटपोस्टसाठी 500 पाउंडपेक्षा जास्त कार्गो घेऊन जाईल. दोन्ही अंतराळवीर सुमारे आठवडाभर अंतराळ स्थानकावर थांबतील. यादरम्यान तो स्पेस स्टेशनवर आवश्यक चाचण्या घेतील. सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि विल्मोर (Wilmore) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर त्यांची मोहीम सुरू ठेवतील, स्टारलायनरवर त्यांचं मिशन व्यावसायिक भागीदारीद्वारे अंतराळात मानवतेच्या प्रवेशाचा विस्तार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. (Sunita Williams)

दरम्यान, 2012 मध्ये सुनीता विल्यम्स आंतरराष्ट्रीय इंटरनेशनल स्पेस स्टेशनच्या प्रवासादरम्यान अंतराळात ट्रायथलॉन पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. यादरम्यान, त्यांनी वेट लिफ्टिंग मशीन वापरून पोहण्याची नक्कल केली आणि हार्नेसला बांधलेल्या ट्रेडमिलवर धावल्या होत्या. (Sunita Williams)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.