प्लास्टिक मुळे जमिनीवर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. पावसाळ्यामध्ये रस्त्यावरती पडलेला प्लास्टिकचा कचरा पाण्यामध्ये वाहून जातो आणि हे प्लास्टिक जर पाण्यामध्ये असणाऱ्या लहानशा जीवांनी खाल्ले तर त्यांना श्वास घेण्यासठी त्रास होतो आणि पाण्याचे देखील प्रदूषण होते. प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने पर्यावरणाची हानी होत आहे. मात्र आता प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण थांबणार असल्याचे संकेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणारे कीटक संशोधकांना सापडले आहेत. हे कीटक स्टायरोफोम (Styrofoam) खातात. स्टायरोफोम म्हणजे थर्मोकोल/स्टायरोफोम, डिस्पोजेबल कटलरी, सीडी केस, लायसन्स प्लेट फ्रेम्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे भाग, ऑटोमोबाईल पार्ट्स पॉलिस्टीरिन प्लास्टिकपासून बनवले जातात. हे ‘सुपरवर्म’ (Zophobas morio) प्रजातीतील आहेत. हे मीलवर्म्स (mealworms) आणि वॅक्स वर्म (wax worms) पेक्षा किमान पाच पट मोठे असू शकतात.
हे कीटक आपल्याला प्लास्टिकचा नायनाट करण्यास मदत करू शकतात. हे प्लॅस्टिकचे बायोडिग्रेड करण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करू शकतात. मायक्रोबियल जीनोमिक्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नव्या संशोधनात, या शोधाबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे. कीटकांचे तीन नियंत्रण गट तयार करण्यात आल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. तिघांपैकी एका गटाला काहीही दिले गेले नाही, एकाला कोंडा आणि एकाला प्लास्टिक दिले गेले. संशोधनात असे आढळून आले की सुपरवर्म्सच्या या तीन गटांनी सर्व अन्न खाऊन त्यांचे जीवन चक्र पूर्ण केले. तर पॉलिस्टीरिनवर पाळलेल्या सुपरवर्मचे वजन कमी वाढले होते.
या संशोधनाच्या निकालांच्या आधारे असे समोर आले की, प्लास्टिक प्रदूषणाच्या वाढत्या संकटाचा सामना करण्यासाठी हे कीटक आपल्याला मदत करू शकतात. जर कीटक प्लास्टिक खाऊन जगू शकले तर प्लास्टिक नष्ट करण्यास मदत होईल. पॉलिस्टीरिन खाणाऱ्या कीटकांना प्लास्टिकमध्ये असलेल्या रोगजनक जीवाणूंचा प्रादुर्भाव झाला होता, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम झाला.
क्वीन्सलँड विद्यापीठातील वरिष्ठ व्याख्याता आणि संशोधनाचे वरिष्ठ लेखक ख्रिस रिंके यांच्या मते, आमच्याकडे सुपरवर्मच्या पोटात एन्कोड केलेल्या सर्व बॅक्टेरियाच्या एन्झाइमची यादी आहे. पॉलिस्टीरिन कमी करण्याची क्षमता असलेल्या एन्झाईम्सची आम्ही पुढे संशोधन करत आहोत आणि प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याचा हा एक चांगला मार्ग असू शकतो, असेही संशोधक म्हणाले.
Join Our WhatsApp Community