मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात सध्या कुठलीही चार्जशीट दाखल न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे तुर्तास दिलासा मिळाला आहे. परमबीर सिंह यांना अटक न करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेली मुदत आज संपली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी आज झाली.
Supreme Court asks CBI to file its affidavit on Singh's plea and posts the matter for hearing on January 11th, 2022.
CBI tells Supreme Court that it has no issue in taking over the probe of criminal cases filed against Singh by Maharashtra Police.
— ANI (@ANI) December 6, 2021
परमबीर यांना न्यायालयाकडून दिलासा
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे आदेश या आधीच्या सुनावणीत दिले होते. अटक न करण्याची मुदत आज संपतअसल्याने या प्रकरणी पुन्हा सुनावणी झाली. यावेळी त्यांना न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे.
(हेही वाचा -…तर बूस्टर डोसची गरज आहे का?, अजित पवारांची स्पष्ट भूमिका)
पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार
महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंहवर नोंदवलेले सर्व खटले सीबीआयकडे वर्ग केल्यास आमची हरकत नसल्याचे सीबीआयने न्यायालयात म्हटले. त्यानंतर न्यायालयाने सीबीआयला एका आठवड्यात लेखी प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले आहे. इतर पक्षकारांना सीबीआयच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे
Join Our WhatsApp Community