परमबीर सिंग आहेत कुठे? सर्वोच्च न्यायालयाने खडसावून विचारले

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना बुधवारी फरार घोषित करण्यात आले. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता परमबीर सिंग यांना दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. परमबीर सिंग यांनी यांच्या वकिलांच्या मार्फत अटकेपासून संरक्षण देणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी परमबीर यांच्या वकिलांना खडसावले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे आदेश

परमबीर सिंग यांनी त्यांच्या वकिलांनी केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी सिंग यांच्या वकिलांना खडसावले. परमबीर सिंग कुठे आहेत, त्यांचा ठावठिकाणा काय, याची माहिती न्यायालयाला प्रथम द्या, असे आदेश न्यायमूर्तींनी यावेळी दिले आहे.

न्यायालयाकडून परमबीर यांच्या वकिलांची झडती

परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे, त्यानंतर त्यांनी देशाबाहेर पळ काढला असल्याची चर्चा आहे. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांच्या वकिलांची झडती घेतली. ‘याचिकाकर्ते जगाच्या कोणत्या कोपऱ्यात आहेत? ते या देशात आहेत की देशाबाहेर गेलेत? याचिकाकर्ते कुठे आहेत ते आम्हाला सर्वप्रथम जाणून घ्यायचं आहे,’ असं न्यायमूर्ती एस. के. कौल यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here