विजय माल्याला ‘या’ प्रकणात २ हजारांच्या दंडासह ४ महिने तुरूंगवास!

140

सर्वोच्च न्यायालयाने फरार उद्योगपती विजय मल्ल्याला चार महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. विजय मल्ल्या याला न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच दंड न भरल्यास न्यायालयाकडून दोन महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने का सुनावली शिक्षा

न्यायमूर्ती यूयू ललित यांच्या अध्यक्षतेखाली रविंद्र एस भट आणि पी एम नरसिंह यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. खंडपीठाने १० मार्च रोजी आपला निकाल राखून ठेवला होता. सोमवारी, सर्वोच्च न्यायालयाने ४ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि फरारी उद्योगपती विजय मल्ल्याला २००० रुपयांचा दंड ठोठावला. २०१७ मध्ये न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल तो दोषी ठरला होता, या प्रकरणी न्यायालयाने त्याला ही शिक्षा सुनावली आहे.

(हेही वाचा – बीडमध्ये एकादशीला भगरीच्या दशम्या खाल्याने ७० जणांना विषबाधा)

काय आहे प्रकरण

सर्वोच्च न्यायालयाने २०१७ च्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी मल्ल्याच्या बाजूने पुनर्रिक्षण याचिका २०२० मध्ये रद्द केली होती. या प्रकरणी त्याच्या शिक्षेचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. न्यायालयाने आपल्या आदेशाचा दाखला देत आपल्या मुलांच्या बँक खात्यामध्ये ४ कोटी डॉलर हस्तांतरण करणं हा न्यायालयाचा अपमान असल्याचे सांगितले होते. मालमत्तेचा अचूक तपशील न दिल्याने मल्ल्याला २०१७ मध्ये न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. न्यायालयाच्या या निर्णयावर मल्ल्या यांनी दाखल केलेली पुनर्विलोकन याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. १० फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने विजय मल्ल्याला त्याच्याविरुद्धच्या अवमान प्रकरणात वैयक्तिकरित्या किंवा वकिलामार्फत हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांची अंतिम संधी दिली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.