बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णींना अखेर जामीन मंजूर

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील बांधकाम डी.एस. कुलकर्णी यांची आणि त्यांची पत्नी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तब्बल चार वर्षांनी त्यांची सुटका झाली आहे. बांधकाम व्यावसायिक डी.एस.के आणि त्यांच्या पत्नींवर दाखल आणखी चार गुन्ह्यांत खटले सुरु असल्याने डी.एस.के. पती- पत्नींना तुरुंगातच रहावे लागणार आहे. मंगळवारी, २६ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने डी.एस. कुलकर्णी यांना त्यांच्यावर दाखल मुख्य गुन्ह्यात जामीन मंजूर केल्याने डी.एस. कुलकर्णी तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

फेब्रुवारी 2018 मध्ये अटक करण्यात आलेली 

डी.एस.कें.वर सुरु असलेल्या चार खटल्यांमध्ये देखील त्यांना जामीन मंजूर झाला तर ते तुरुंगातून बाहेर येऊ शकतात. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल डी.एस.के. आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यावर 28 मे 2017 रोजी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर डी एस के आणि त्यांच्या पत्नीवर इतरही अनेक गुन्हे दाखल झाले. मात्र शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा हा हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यात डी एस के आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना फेब्रुवारी 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र आज राज्य सरकारचे वकील राहुल चिटणीस हे डी.एस कुलकर्णींच्या जामीनाला विरोध करण्यासाठी आवश्यक ती कारणे देण्यास कमी पडले असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

काय होते प्रकरण?

लोकांना जास्त पैशाचं आमिष दाखवून पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके यांनी हजारो गुंतवणूकदारांना 2 हजार 43 कोटींना फसवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. याप्रकरणी त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी, जावई यांच्या विरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here