मराठीसह 22 भाषांमध्ये मिळणार सर्वोच्च न्यायालयाचे निकाल

158

प्रजासत्ताक दिनापासून विविध भारतीय अनुसूचित भाषांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकाल देण्यास प्रारंभ करणारी सेवा सुरु करण्याची घोषणा सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी बुधवारी केली.

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी वकिलांना सांगितले की, सर्वोच्च न्यायालय अनुसूचित भाषांमध्ये विनामूल्य उपलब्ध निकाल करुन देण्यासाठी गुरुवारपासून इलेक्ट्राॅनिक- सुप्रीम कोर्ट रिपोर्ट्स ( ई- एससीआर) प्रकल्प कार्यान्वित करील. त्यात सध्या जवळपास 34 हजार निकाल उपलब्ध आहेत. शिवाय त्यात शोध सुविधाही आहेत. आमच्याकडे आता प्रादेशिक भाषांमध्ये 1 हजार 91 निवाडे आहेत. जे प्रजासत्ताक दिनी उपलब्ध केले जातील.

वेबसाइटवर निकाल

ई- एससीआर प्रकल्पाचा भाग म्हणून हे निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या वेबासाईटवर, मोबाइल अॅपवर आणि नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडच्या ( एनजेडीजी) जजमेंट पोर्टलवर उपलब्ध आहेत.

मराठीत 14 निकाल

आमच्याकडे ओरियामध्ये 31, मराठीत 14, आसामीमध्ये 4, कन्नडमध्ये 17, मल्याळमध्ये 29, नेपाळीमध्ये 3, पंजाबीमध्ये 4, तमीळमध्ये 52, तेलगूमध्ये 28 आणि उर्दूमध्ये 3 निकाल उपलब्ध आहेत, असे सरन्यायाधीशांनी सांगितले.

( हेही वाचा: लँड जिहादविरुध्द हिंदू समाज आक्रमक! धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा )

अनुसूचित 22 भाषा

आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलुगू, उर्दू, बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी अशा 22 भाषा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.