लखीमपूर खेरी ( Lakhimpur Kheri) प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर करताना, न्यायालयाने आशिष मिश्रावर काही अटी घातल्या आहेत. आशिष मिश्राला दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये राहता येणार नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. आशिष मिश्राला आठ आवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मागच्या वर्षी लखीमपूर खेरी येथे आंदोलन करणा-या शेतक-यांना थार गाडीखाली चिरडण्यात आल्याची घटना घडली होती. यामध्ये काही शेतक-यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलाग आशिष मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आरोपींना बेदम मारहाण करणा-या चार शेतक-यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
( हेही वाचा: सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार होता; अमेरिकेच्या माजी मंत्र्यांच्या दाव्याने खळबळ )
‘या’ अटींवर जामीन मंजूर
जामिनावर सुटल्यानंतर आशिष मिश्राला आठवडाभरात उत्तर प्रदेश सोडावे लागणार आहे. तसेच, आशिष मिश्राला त्याचा राहण्याचा पत्ता पोलिसांना सांगावा लागणार आहे. तसेच, दररोज त्याला पोलीस ठाण्यात रिपोर्ट करावे लागणार आहे. साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव ते टाकू शकत नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, आशिष मिश्राला कोणत्याही साक्षीदाराला भेटता येणार नसल्याचेही न्यायालयाने सांगितले आहे.