महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्या भागात कमी पाऊस पडतो त्याभागात लगेच निवडणुका घेण्यात याव्या तसेच जिथे जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणी मान्सूनंतर निवडणूका घ्याव्यात असे म्हटले आहे. त्यामुळे मुंबई, कोकण या जास्त पाऊस पडणाऱ्या भागात पावसाळ्यानंतर निवडणुका होतील हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
( हेही वाचा : रक्तदाब नियंत्रणासाठी ‘बेस्ट’ मोहीम; कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी सिम्पल अॅप )
मुंबई महापालिका निवडणूक पावसाळ्यानंतर
मराठवाडा आणि विदर्भ या भागात कमी पाऊस पडत असल्यामुळे याठिकाणी वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्यात याव्यात असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. परंतु कोकण आणि मुंबईत पावसाळ्यानंतर निवडणुका घ्या असा आदेश देण्यात आला आहे.