वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीवर आज गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वाराणसी न्यायालयाला आज कोणताही आदेश न देण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी आज सुनावणी होणार नसून शुक्रवारी दुपारी ३ वाजता ही सुनावणी होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने सध्या या प्रकरणाची सुनावणी उद्या शुक्रवारपर्यंत तहकूब केली आहे. तोपर्यंत वाराणसी न्यायालयातही सुनावणी होणार नाही, असेही सांगण्यात आले.
Supreme Court asks trial court in Varanasi not to proceed with the Gyanvapi Mosque case till Friday, 20th May.
— ANI (@ANI) May 19, 2022
गुरुवारी वाराणसी न्यायालयासमोर मशिदीच्या सर्वेक्षणाबाबत न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष सहाय्यक आयुक्तांचा अहवाल सादर करण्यात आला होता. दोन पानी अहवालात हिंदू धर्माचे प्रतिकं आणि चिन्हं सापडल्याचा दावा माजी कोर्ट कमिशनर यांनी केला आहे. वाराणसी न्यायालयाच्या आदेशानंतर ६ मे आणि ७ मे रोजी हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. दरम्यान, वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीबाबत सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर नोटीस जारी केली होती.
(हेही वाचा – मुंबई विभागातील ‘ही’ प्रमुख स्थानकं होणार चकाचक!)
दरम्यान, ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला. शिवलिंग सापडलेली जागा सील करण्याचे आदेश वाराणसी न्यायालयाने दिले. यानंतर सोमवारी ज्ञानवापी मशिदीतल्या तलावाचे पाणी उपसून तिथे व्हिडीओ ग्राफी करण्यात आली. मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम सोमवारी पूर्ण झाले. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर, हिंदू पक्षाने शिवलिंग मिळाल्याचा दावा केला. मागील तीन दिवसांपासून ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण सुरु होते. या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या शेवटच्या दिवशी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे.
Join Our WhatsApp Community