फाशीच्या शिक्षेबद्दल सर्वोच्च न्यायालय बनवणार मार्गदर्शक तत्त्वे

176

फाशीच्या शिक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालय मार्गदर्शक तत्त्वे (गाईड-लाईन) बनवणार आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे हे प्रकरण सोपवण्यात आले आहे. कोणत्या परिस्थितीत आणि केव्हा फाशीची शिक्षा कमी करण्याचा विचार केला जाऊ शकतो, यावर 5 न्यायाधीशांचे खंडपीठ निर्णय देणार आहे. वेगवेगळ्या निर्णयांमध्ये मत आणि दृष्टिकोनाचा फरक असल्याने हा आदेश आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

( हेही वाचा : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर कैलास राजपूतला भारतात आणण्यासाठी हालचाली )

सरन्यायमूर्ती उदय लळीत, न्या. एस रवींद्र भट, न्या. सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांनी दिलेल्या विविध निकालांचा संदर्भ दिला. खंडपीठाच्या उदाहरणांमध्ये 1983 च्या बचन सिंग विरुद्ध पंजाब राज्याच्या निकालाचा समावेश आहे. फाशीची शिक्षा सुनावताना पाच न्यायाधीशांचे मोठे खंडपीठ असणे आवश्यक असल्याचे न्यायालयाचे मत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली होती आणि असे निरीक्षण नोंदवले होते की, फाशीची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी शिक्षा कमी करणाऱ्या परिस्थितीचा विचार संबधित खटल्याची सुनावणी सुरू असताना करणे गरजेचे असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे. सरन्यायमूर्ती उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गेल्या 17 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान सांगितले होते की, न्यायालय योग्य असेल त्याप्रमाणे शिक्षा सुनावण्यापूर्वी अशा शिक्षेला स्थगिती देऊ शकतात. मात्र, यासाठी एक मोठे खंडपीठ असणे आवश्यक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.