सुराणा समूहाला दणका; ईडीने जप्त केल्या 67 पवनचक्या

89

मुख्य कंपनीला कर्जापोटी मिळालेला पैसा बनावट कंपन्या स्थापन करुन त्यात वळवणे तसेच कर्जाची परतफेड न करता कर्ज थकवणे, या प्रकरणी सुराणा उद्योग समूहाला ईडीने दणका देत कंपनीची 113 कोटी 32 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये 67 पवनचक्क्यांचाही समावेश आहे. या प्रकरणी कंपनीच्या संचालकांवर मनी लाॅड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेन्नईस्थित सुराणा समूहाने सरकारी बॅंकाचे 3 हजार 986 कोटी रुपयांचे कर्ज थकवल्याप्रकरणी सीबीआयने यापूर्वीच तीन एफआयआर दाखल करत कंपनीच्या संचालकांना अटक केली आहे.

 या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली 

या एफआयआरच्या आधारे ईडीने पुढील तपास सुरु केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, कंपनीला बॅंकेकडून कर्ज प्राप्त झाल्यानंतर, कंपनीने काही बनावट कंपन्या स्थापन केल्या. यामध्ये आपले कर्मचारी, आपले नातेवाईक यांची संचालकपदी नेमणूक दाखवली.  तसेच, या कंपन्यांसोबत केवळ कागदोपत्री खरेदी- विक्रीचा व्यवहार दाखवला. हे सारे करताना, बनावट कंपन्यांत वळवलेले पैसे आणि कागदोपत्री व्यवहारातील पैसा, हे सारे पैसे कंपनीने संचालकाच्या वैयक्तिक वापरासाठी खर्च केले. या कर्जापोटी प्राप्त पैशांतून कंपनीने परदेशांतदेखील दोन ठिकाणी मालमत्तांची खरेदी केली. या बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही. परिणामी बॅंकेचे कर्ज खाते थकीत झाले. या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश सुराणा, विजय सुराणा आणि अन्य दोन बोगस संचालकांना अटक करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.