आश्चर्य! दिल्लीत आहे Japanese Park; इथे आल्यावर काय काय कराल?

43
आश्चर्य! दिल्लीत आहे Japanese Park; इथे आल्यावर काय काय कराल?
आश्चर्य! दिल्लीत आहे Japanese Park; इथे आल्यावर काय काय कराल?

जगभरात अनेक सुंदर जपानी-प्रेरित उद्याने आहेत! दिल्लीतील रोहिणी येथील जॅपनिस पार्क हे याचं एक उल्लेखनीय उदाहरण आहे. यास स्वर्ण जयंती पार्क म्हणूनही ओळखले जाते. हिरवेगार, वळणदार मार्ग आणि पाणवठ्यांमुळे इथे मनःशाती प्राप्त होते. (Japanese Park)

(हेही वाचा- Helicopter Crash: गुजरातच्या पोरबंदरमध्ये तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले, 3 ठार)

जॅपनिस पार्क सेक्टर १०, रोहिणी, दिल्ली येथे स्थित असून रेड लाईनवरील रिठाला मेट्रो स्टेशन हे जवळचे मेट्रो स्टेशन आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांना सहज पोहोचता येते. अंदाजे २५० एकर क्षेत्रात पसरले असल्यामुळे हे दिल्लीतील सर्वात मोठ्या उद्यानापैकी एक आहे. (Japanese Park)

या उद्यानाची देखभाल दिल्ली विकास प्राधिकरण (DDA) द्वारे केली जाते. येथे दृष्टी जाईल तिथे हिरवळ, स्वच्छ मार्ग आणि निर्मळ जलकुंभ आहेत. एक टीहाऊस, एक कोई तलाव आणि टोरी गेट असल्यामुळे जपानच्या संस्कृतीचं दर्शन आपल्याला घडतं. त्यामुळे या पार्कमध्ये येणार्‍या लोकांना एक सुंदर आणि अद्भुत अनुभव मिळतो. (Japanese Park)

(हेही वाचा- लडाखवर Chinaचे बेकायदेशीर नियंत्रण भारताला मान्य नाही; परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सुनावले)

मुलांसाठी विविध मैदानी खेळ खेळण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच इथल्या नयनरम्य तलावात सुंदर अशा रंगीबेरंगी बोटींमध्ये बसून फिरु शकता. जर तुम्ही पिकनिकला येण्याची योजना आखत असाल तर हे एक आदर्श ठिकाण आहे. इथे भरपूर फोटो आणि सेल्फी काढू शकता. तसेच सकाळी चालणे व धावणे यासाठी देखील हा उत्तम पर्याय आहे. (Japanese Park)

या गार्डनमध्ये लहान कॅफेटेरिया, आइस्क्रीम विक्रेते आणि फूड कार्ट्स उपलब्ध आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करण्यात येतात. पार्कमधून परतताना आणखी आकर्षणे आहेत. जसे की खरेदी आणि मनोरंजनासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. (Japanese Park)

(हेही वाचा- Chhattisgarh मध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 4 नक्षलवादी ठार, DRG चा एक जवान हुतात्मा)

वेळ आणि तिकीट किंमत
आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ५:०० ते रात्री ११:००.
प्रवेश शुल्क: सर्वांसाठी विनामूल्य. 

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.