सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एनसीबीची मोठी कारवाई! केली मित्राला अटक

गेल्या वर्षभरापासून देशभर चर्चेत असलेल्या सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण विभाग(एनसीबी)कडून आता सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुशांतसोबत राहणारा त्याचा सहकारी मित्र सिद्धार्थ पिठाणी याला या प्रकरणात हैद्रबाद येथून अटक करण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत याला ड्रग्स देण्यासाठी कट केल्याचा आरोप, सिद्धार्थवर लावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच त्याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर या आत्महत्येवरुन अनेक संशय निर्माण करण्यात आले. सुशांतच्या कुटुंबियांनीही ही आत्महत्या नसून, सुशांतची हत्या करण्यात आल्याचा दावा केला होता. त्यानंतर सुशांतच्या चाहत्यांनी सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी, समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर मोहीम उभी केली.

हे प्रकरण चिघळल्यानंतर याबाबतचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. त्या तपासात सुशांतने आत्महत्या केल्याचे सिद्ध झाले.

एनसीबीचा तपास

या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता. एनसीबीकडून रिया चक्रवर्ती, दिपेश सावंत, शोविक चक्रवर्ती यांची चौकशी करण्यात आली होती. या सर्व घडामोडींनंतर सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे गूढ वाढले होते.

काय आहे सिद्धार्थचा खुलासा?

सुशांत सिंह राजपूत आणि त्याची प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यात सुशांतच्या आत्महत्येपूर्वी कडाक्याचे भांडण झाल्याचा खुलासा सिद्धार्थने सीबीआय चौकशीत केला होता. त्यानंतर सुशांतच्या घरातील 8 हार्ड डिस्क नष्ट करण्यात आल्याचेही त्याने चौकशीत सांगितले होते. हार्ड डिस्कमध्ये सुशांत आणि रियाच्या कुटुंबाच्या परदेश दौऱ्याचे फोटो, तसेच दोघांच्या कंपन्यांचे महत्त्वाचे कागदपत्रही हार्ड डिस्कमध्ये असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here