अंगाडीया खंडणी प्रकरणी डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचे निलंबन 

182

लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणी प्रकरणात तत्कालीन पोलीस उपायुक्त (डीसीपी) यांचा सहभाग असल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात आढळून आल्यानंतर गृहविभागाने तत्कालीन पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना निलंबित केले आहे. सौरभ त्रिपाठी यांनी याप्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असून या अर्जावर २३ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

अंगाडीया कुरिअर सर्व्हिस चालविणाऱ्या व्यापाऱ्याकडे दरमहा १० लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी अंगाडीया असोसिएशनच्या तक्रारीनंतर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तीन पोलीस अधिकारी यांना अटक करण्यात आली आहे, या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या सीआययु कडे सोपवण्यात आला असून सीआययुच्या तपासात तत्कालीन पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचा सहभाग आढळून आला आहे, अंगाडीया यांनी त्रिपाठी यांच्या विरोधात काही पुरावे गुन्हे शाखेकडे सोपवले असून या आधारे गुन्हे शाखेने सौरभ त्रिपाठी यांना या प्रकरणात आरोपी केले आहे.

(हेही वाचा – उपायुक्त सौरभ त्रिपाठींच्या नोकराला ‘या’ प्रकरणात झाली अटक!)

२३ मार्चला जामिनावर होणार सुनावणी 

दरम्यान, मुंबई पोलिसांकडून सौरभ त्रिपाठी यांच्या निलंबनासाठी गृहविभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. गृहविभागाने या प्रस्तावावर निर्णय देत मंगळवारी त्रिपाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. सौरभ त्रिपाठी यांनी याप्रकरणात अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या जामिनावर २३ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.