कोकणातील रायगडच्या समुद्र किनाऱ्याजवळ शनिवारी संशयास्पद बोट आढळली आहे. नौदल आणि तटरक्षक दलाकडून या बोटीची तपासणी सुरू आहे. मुंबई अरेबियन कोस्ट किनाऱ्याजवळ शनिवारी एक संशयास्पद बोट दिसली. ही बोट रायगडच्या किनारपट्टीवर आढळल्याची माहिती समोर येत आहे. नौदल आणि तटरक्षक दलाचे अधिकारी या बोटीचा शोध घेत आहेत.
( हेही वाचा : रत्नागिरीत तीन ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा)
शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास बोट दिसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई पोलीस बंदर क्षेत्राला सकाळी 10 वाजता याची माहिती देण्यात आली. ही बोट नौदलाच्या हद्दीत सापडली आहे. त्यामुळे नौदलाकडून कारवाई करण्यात येणार आहे. जॉइंट ऑपरेशन सेंटरने मुंबई पोलिस आणि याबाबत इतर यंत्रणांना माहिती दिली होती.
या बोटीवरील दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर नौदलाकडून मुंबई पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या तपासामध्ये संपूर्ण गोपनीयता बाळगण्यात येत आहे. तसेच कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढल्यास याबाबत पोलिसांना कळवा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community