हत्या की आत्महत्या? जम्मूच्या सिदरा परिसरात एकाच कुटुंबातील 6 जणांचा संशयास्पद मृत्यू

105

जम्मू शहरातील सिदरा परिसरात बुधवारी सकाळी एकाच कुटुंबातील 6 जण मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. कुटुंबातील 6 सदस्यांचा एकाच वेळी मृत्यू कसा झाला, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. जे काही तथ्य समोर येईल, त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल, असे या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या हे लवकरच उघड होईल, असेही पोलिसांकडून सांगितले जात आहे.

(हेही वाचा – जॅकलीनच्या अडचणीत वाढ! 215 कोटींच्या खंडणीप्रकरणी ED कडून आरोपत्र दाखल)

स्वतःच्या राहत्या घरी संशयास्पद मृत आढळलेल्यांमध्ये सकीना बेगम, त्यांच्या दोन मुली नसीमा अख्तर आणि रुबिना बानो, मुलगा जफर सलीम आणि दोन नातेवाईक नूर-उल-हबीब आणि साजाद अहमद यांचा समावेश आहे.

जम्मू शहरातील सिदरा भागात एका घरात दोन मृतदेह सापडले आहेत, तर दुसऱ्या घरात चार मृतदेह सापडले आहेत. पोलिसांनी सांगितले की, मृतदेह येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांचे पथक परिसरात पोहोचले आहे. तपास सुरू करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.