एसव्हीकेएमच्या एनएमआयएमएसकडून अभियांत्रिकी आणि फार्मसी अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षेची घोषणा!

ही परीक्षा संगणकावर आधारित असेल आणि ती २७ जून, २ जुलै आणि ४ जुलै २०२१ रोजी भारतातील ४६ शहरांमधील परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाईल.

92

एसव्हीकेएमच्या एनएमआयएमएस अभिमत विद्यापीठ या शैक्षणिक सर्वोत्तमतेचा ४० वर्षांचा वारसा चालवणाऱ्या संस्थेने मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनीअरिंग(एमपीएसटीएमई), मुंबई, स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनीअरिंग(एसटीएमई), नवी मुंबई आणि शोभाबेन प्रतापभाई पटेल स्कूल ऑफ फार्मसी अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट(एसपीपीएसपीटीएम) येथील पदवी अभ्यासक्रमांसाठी एनएमआयएमएस-सीईटी २०२१ – सामायिक प्रवेश परीक्षेसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. बी. टेक, पाच वर्षांचे एकात्मिक एमबीए टेक. (बीटेक + एमबीए टेक) आणि बी.फार्म.+ एमबीए (फार्मा. टेक.) अभ्यासक्रमांसाठी एनएमआयएमएस-सीईटी २०२१ देणे सक्तीचे आहे. सर्वोच्च १०० गुणवंत विद्यार्थ्यांना बी. टेक. आणि एमबीए टेकसाठी उपलब्ध असलेल्या २५ शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज करण्याची संधी मिळेल. ही परीक्षा संगणकावर आधारित असेल आणि ती २७ जून, २ जुलै आणि ४ जुलै २०२१ रोजी भारतातील ४६ शहरांमधील परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाईल.

प्रवेश प्रक्रिया: अर्ज करण्यासाठी तुमचा अर्ज www.nmimscet.in येथे दाखल करा. उमेदवार दोन वेळा परीक्षा देऊ शकतात आणि सर्वोत्तम गुण निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जातील. ही परीक्षा दोन फेऱ्यांमध्ये पार पडेल आणि त्यानंतर तिसऱ्या फेरीत समुपदेशन केले जाईल.

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख: १७ जून २०२१

अभ्यासक्रमाचे तपशील:

संस्थामुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनीअरिंग (एमपीएसटीएमई), मुंबई

अभ्यासक्रम:

बी. टेक

स्पेशलायझेशन

  • कम्‍प्‍युटर सायन्स (डेटा सायन्स) – व्हर्जिनिया टेक, यूएसएकडून बीएस आणि एमएस करण्याच्या संधीसह (३११ समन्वयित उपक्रम.)
  • डेटा सायन्स – व्हर्जिनिया टेक, यूएसएकडून शैक्षणिक समन्वयासह
  • आर्टिफिशियल इंटेलिजेन्स – व्हर्जिनिया टेक, यूएसएकडून शैक्षणिक समन्वयासह
  • कम्‍प्‍युटर सायन्स (सायबर सिक्युरिटी) – व्हर्जिनिया टेक, यूएसएकडून शैक्षणिक समन्वयासह
  • मेकॅनिकल
  • सिव्हिल
  • मेकॅट्रॉनिक्स
  • माहिती तंत्रज्ञान
  • कम्‍प्‍युटर
  • इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन
  • कम्‍प्‍युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टिम- टीसीएससोबत भागीदारीत

पात्रता: १०+२ किंवा समकक्ष परीक्षा आंतरराष्ट्रीय आयबी डिप्लोमासह (देण्यात येणारे आयबी प्रमाणपत्र पात्र नाही) सायन्स किंवा सायन्स व्होकेशनलसह आणि पीसीएममध्ये किमान ५० टक्‍के गुण. यावर्षी आपल्या १०+२ परीक्षांच्या निकालांच्या प्रतिक्षेत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.

एमबीए टेक (बी. टेक. एमबीए टेक.)

दुहेरी पदवी एकात्मिक अभ्यासक्रम

इंजिनीअरिंग स्पेशलायझेशन्स

  • इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
  • कम्प्युटर्स
  • इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स
  • मेकॅनिकल्स

मॅनेजमेंट स्पेशलायझेशन्स

  • मार्केटिंग (डिजिटल अ‍ॅनालिटिक्स)
  • फायनान्स (फिनटेक ब्लॉकचेन)
  • ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन
  • बिझनेस इंटेलिजेन्स अँड अ‍ॅनालिटिक्स
  • स्ट्रॅटेजी अँड इनोव्हेशन

पात्रता: १०+२ किंवा समकक्ष परीक्षा आंतरराष्ट्रीय आयबी डिप्लोमासह (देण्यात येणारे आयबी प्रमाणपत्र पात्र नाही) सायन्स किंवा सायन्स व्होकेशनलसह आणि पीसीएममध्ये किमान ५० टक्‍के गुण. यावर्षी आपल्या १०+२ परीक्षांच्या निकालांच्या प्रतिक्षेत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.

संस्थास्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनीअरिंग (एसटीएमई), नवी मुंबई

अभ्यासक्रम:

बी.टेक. (ऑनर्स)

स्पेशलायझेशन्स

  • कम्‍प्‍युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टिम- टीसीएससोबत भागीदारीत

पात्रता: १०+२ किंवा समकक्ष परीक्षा आंतरराष्ट्रीय आयबी डिप्लोमासह (देण्यात येणारे आयबी प्रमाणपत्र पात्र नाही) सायन्स किंवा सायन्स व्होकेशनलसह आणि पीसीएममध्ये किमान ४५ टक्‍के गुण. यावर्षी आपल्या १०+२ परीक्षांच्या निकालांच्या प्रतिक्षेत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.

एमबीए टेक. (बी. टेक. + एमबीए टेक.)

ड्युएल डिग्री इंटिग्रेटेड अभ्यासक्रम

  • कम्‍प्‍युटर इंजिनीअरिंग

पात्रता: १०+२ किंवा समकक्ष परीक्षा आंतरराष्ट्रीय आयबी डिप्लोमासह (देण्यात येणारे आयबी प्रमाणपत्र पात्र नाही) सायन्स किंवा सायन्स व्होकेशनलसह आणि पीसीएममध्ये किमान ५० टक्‍के गुण. यावर्षी आपल्या १०+२ परीक्षांच्या निकालांच्या प्रतिक्षेत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.

संस्थाशोभाबेन प्रतापभाई पटेल स्कूल ऑफ फार्मसी अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट (एसपीपीएसपीएम), मुंबई

अभ्यासक्रम:

बी.फार्म. + एमबीए (फार्माटेक.)

(एकात्मिक अभ्यासक्रम)

पात्रता:१०+२ किंवा समकक्ष परीक्षा आंतरराष्ट्रीय आयबी डिप्लोमासह (देण्यात येणारे आयबी प्रमाणपत्र पात्र नाही) सायन्स किंवा सायन्स व्होकेशनल फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्ससह (पीसीएम) किंवा फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीसह (पीसीबी) आणि इंग्लिश एक सक्तीचा विषय म्हणून आणि (पीसीएम/पीसीबी) मध्ये किमान ५० टक्‍के गुण. यावर्षी आपल्या १०+२ परीक्षांच्या निकालांच्या प्रतिक्षेत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.