स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक! राज्यभर चक्काजाम आंदोलन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील वणी येथे कांदा रस्त्यावरती फेकून आंदोलन करण्यात आले यामुळे महाराष्ट्र गुजरात महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरली आहे.

…अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा 

वणी येथे शिर्डी – सुरत महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कवडीमोल भावात मिळणारा कांदा तसेच द्राक्ष रस्त्यावर ठेवत निषेध देखील नोंदवण्यात आला.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप म्हणाले की, शेतकरी मोठ्या अडचणीत आहे राज्य सरकारने आदेश देऊनही कोणत्याही प्रकारची मदत जिल्हा बँकेकडून होत नाही तसेच विद्युत मंडळाकडून वीज कनेक्शन तोडू नये असे आदेश असतानाही वीज कनेक्शन तोडले जाते फळे भाजीपाला यांचा उत्पादन खर्चही निघत नाही त्यासाठी अनुदान देणे आवश्यक आहे. यासारख्या अनेक घटना आहेत त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. या सर्व बाबींवर शेतकऱ्यांना एकत्रित करणे आणि त्यांना मार्गदर्शन करावे या हेतूने हे आंदोलन केले गेले येणाऱ्या काळात सरकारने याची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here