हिंदू आध्यात्मिक आणि सेवा संस्थानच्या (Hindu Spiritual and Service Mela) वतीने ९ ते १२ जानेवारी या कालावधीत महाराणी अहिल्याबाई होळकर मैदान, गोरेगाव (प.) येथे भव्य हिंदू आध्यात्मिक आणि सेवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी राज्यभरातील कानाकोपऱ्यातून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांचे स्टॉल लावले आहेत. सुमारे ३०० हुन अधिक संघटनांचे इथे स्टॉल आहेत. या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनेही स्टॉल लावण्यात आला आहे. या स्टॉलला श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj) यांनी भेट दिली. त्यावेळी स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर हे उपस्थित होते.
याप्रसंगी राजेंद्र वराडकर यांनी स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांचे स्मारकाच्या स्टॉलमध्ये स्वागत केले. तेव्हा स्वामी गोविंद देव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘राजकारणाचे हिंदुकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण करण्यात यावे’, या विचार या स्टॉलच्या माध्यमातून पोहचत आहे, असे गौरवोद्गार काढले. स्वामी गोविंद देव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj) यांच्या शुभहस्ते हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.
(हेही वाचा Yogi government ने मागवला १९७८ च्या संभल दंगलीचा अहवाल; दंगलीत २४ हिंदू कुटुंबांना जिवंत जाळले…)
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या या स्टॉलमध्ये वीर सावरकर यांनी लिहिलेली पुस्तके, वीर सावरकर यांच्या विचारांवर आधारित इतर लेखकांनी लिहिलेली पुस्तके यांची प्रतिकृती, सूची ठेवण्यात आली आहे. या स्टॉलला भेट देणाऱ्यांना ही पुस्तक खरेदी करण्यासाठी नोंदणी करणे शक्य होणार आहे. याशिवाय या स्टॉलमध्ये ओम प्रमाणपत्राविषयी माहिती देणारे फलक लावण्यात आले आहे. ‘ओम प्रमाणपत्र’ ही हिंदू संघटना, हिंदूंचा व्यवसाय विकास, हिंदूंचे सक्षमीकरण यासाठी चळवळ आहे. हा हिंदूंच्या अस्तित्वाचा लढा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या चळवळीसाठी ‘ओम प्रतिष्ठान’ स्थापन करण्यात आले आहे. या विषयीची सविस्तर माहिती या स्टॉलद्वारे देण्यात येत आहे. त्याचबरोबर स्मारकाचे डिजिटल मीडिया हाऊस ‘हिंदुस्थान पोस्ट’ याचीही माहिती देणारे फलक या स्टॉलमध्ये लावण्यात आले आहेत.
हिंदू धर्म, संस्कृती, धर्माचरण, राष्ट्रप्रेम इत्यादी विविध विषयांवर कार्य करणाऱ्या ३०० हुन अधिक संघटनांचे स्टॉल इथे आहेत, या संघटनांचे २ हजाराहून अधिक प्रतिनिधी याठिकाणी श्रमदान करत आहेत.
Join Our WhatsApp Community