संत स्वामीनारायण (Swaminarayan) यांचा जन्म ३ एप्रिल १७८१ साली अयोध्येच्या जवळच्या गौंडा नावाच्या गावात ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यादिवशी रामनवमी होती. संपूर्ण परिसर उत्साहाने भारलेला होता. आईवडिलांनी त्यांचं नाव प्रेमाने घनश्याम पांडे असं ठेवलं. पुढे त्यांच्या अनुयायांनी त्यांना प्रेमाने स्वामीनारायण म्हणून संबोधायला सुरुवात केली. त्यांच्या अनुयायांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या हातावर कमळाच्या आकारात हस्तरेखा आणि पायावर उर्ध्वकमलासारखे पदचिन्ह होते. त्यामुळे हे बालक मोठे होऊन धर्मप्रचारक म्हणून समाजाला योग्य दिशा दाखवणार हे ठरलेलेच होते. (Swaminarayan)
वयाच्या पाचव्या वर्षी स्वामीनारायण (Swaminarayan) यांना अक्षरओळख शिकवली गेली. त्यानंतर आठ वर्षांचे झाल्यावर त्यांच्यावर मौंजीबंधन संस्कार करण्यात आले. लहान वयातच त्यांनी शास्त्रांचा अभ्यास करायला सुरुवात केली. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांच्यावर आभाळ कोसळलं. त्यांच्या आई-वडिलांना देवाज्ञा झाली. त्यानंतर काही काळाने ते लोक-कल्याणासाठी घराबाहेर पडले आणि सात वर्षं त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केलं. (Swaminarayan)
स्वामीनारायण म्हणजे महान संत
त्यावेळी लोक त्यांना निलकंठवर्णी या नावाने ओळखायला लागले. त्यांनी गोपालयोगी यांच्याकडून अष्टांग योगाचा अभ्यास शिकून घेतला. भारतभर भ्रमण करताना स्वामीनारायणजी (Swaminarayan) उत्तरेला हिमालय पर्वतापर्यंत गेले. दक्षिणेकडे ते कांची, श्रीरंगपूर, रामेश्वरम इत्यादी ठिकाणी गेले. त्यानंतर ते पश्चिमेकडे पंढरपूर आणि नाशिक ही ठिकाणं करत गुजरात राज्यात गेले. (Swaminarayan)
तिथे स्वामीजींनी गावागावांत फिरून लोकांना स्वामीनारायण मंत्र जपायला सांगितला. त्यांनी समाजाची सेवा करायला सुरुवात केली. पण त्यासाठी कुठलाही मोबदला घेतला नाही. स्वामीनारायण (Swaminarayan) हे जनमानसांत प्रसिद्ध व्हायला लागले. त्यांनी आपल्या अनुयायांना मांस, मदिरा, चोरी आणि व्यभिचार सोडायला सांगितला. तसंच त्यांनी स्वधर्माचं रक्षण करायलाही सांगितलं. त्यांनी अनेक ठिकाणी भव्य मंदिरेही स्थापन केली. ही मंदिरे स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना ठरली आहेत. प्रामुख्याने गुजरात राज्य हे त्यांचं कार्यक्षेत्र होतं. आज तुम्हाला सगळीकडे स्वामीनारायण मंदिरे दिसतात, ते स्वामीनारायण म्हणजे महान संत होते. (Swaminarayan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community