स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ५७ व्या आत्मार्पण दिनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी वीर सावरकरांच्या दादर येथील राष्ट्रीय स्मारकाला भेट देऊन स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावे या मागणीसाठी आपण प्रयत्नशील राहू असेही स्पष्ट केले.
आपले बालपणही दादर परिसरात गेले असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणाच्या दिवशी आपण लहान होतो, शाळेत होतो, त्यावेळीही त्यांचे अखेरचे दर्शन आम्हाला घेऊ दिले होते, त्याचीही आठवण त्यांनी यावेळी सांगितली. सावरकरांचे काम लोकांपर्यंत पोहोचविण्याचे वीर सावरकर स्मारकाच्यावतीने होत आहे, त्या संबंधातही स्मारक आणि पदाधिकाऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली.
यावेळी दादर परिसरातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीही सावरकर स्मारकाला भेट देऊन स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले. ज्ञानदा प्रबोधन संस्था, राष्ट्राभिमानी सेवा समिती, शिव स्वराज्य संघटनेतर्फे स्वा सावरकर स्मारकात जाऊन सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली. यात संस्थेचे अध्यक्ष प्रशांत जनार्दन पळ व पदाधिकारी नितिन येंडे, मनोज म्हामुणकर, भास्कर देवाडीगा, संतोष नारायणे, राज दुदवडकर, राजेश पवार, अभिषेक शिंदे, लालमनी उपाध्याय, प्रदीप शिंदे, अजय पोतदार,ॲड भक्ति जोगल, ॲड प्रज्ञा भिडे, उल्का ठाकूर, प्रियांका पळ व सावरकर प्रेमी यांचा सहभाग होता.
(हेही वाचा – ‘स्त्री’ला धैर्यमूर्ती मानणारे तात्या!)