१४ वर्षांच्या कठोर कारावासानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कारागृहातून मुक्तता झाली. या घटनेला शनिवारी, ६ जानेवारी २०२४ला १०० वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक दिनाचे औचित्त्य साधून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी’निमित्त दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले की, “हा असा एक कार्यक्रम आहे की, जो कुणी चुकवता कामा नये म्हणून मुद्दाम मी या ठिकाणी आलो. मनापासून आपल्या सर्वांचे कौतुक वाटलं. येरवडा जेलमधून सावरकरांची सुटका झाल्यानंतर, त्यापासून प्रेरणा घेऊन आपण ही ज्योत घेऊन महाराष्ट्रसमोर जात आहात. ही ज्योत सावरकरांच्या विचारांची असेल. वीर सावरकरांचे त्या काळातील सामाजिक प्रबोधनाचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शकच आहेत आणि त्यांनी पतितपावन मंदिराची केलेली स्थापना आजही सर्व कोकणवासीयांना प्रेरणा देणारी आहे,” असे सांगून ते पुढे म्हणाले, आज रणजीत सावरकर ती ज्योत घेऊन पुढे जात आहेत. यावेळी सावरकरांच्या नात आपल्यात आहेत ही एक भाग्याची गोष्ट आहे,” असे केसरकर म्हणाले.
(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्ष देशभरात शासकीय कार्यक्रम म्हणून साजरा व्हावा; खासदार राहुल शेवाळे यांची मागणी )
“ वीर सावरकरांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबईमध्ये जे जे करावे लागेल, त्यासाठी आम्ही शासन म्हणून कटिबद्ध आहोत,” असे आश्वस्त करून, “खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहायची इच्छा होती, मात्र त्यांना एक कामानिमित्त जायला लागल्याने त्यांचा मला निरोप आला की, महाराष्ट्र शासनाचे या महत्त्वाच्या कार्यक्रमाला प्रतिनिधित्व असले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community