Swatantryaveer Savarkar : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट प्रोपोगंडा नाही; चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताना काय म्हणाले रणदीप हुड्डा?

299
Swatantryaveer Savarkar : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट प्रोपोगंडा नाही; चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताना काय म्हणाले रणदीप हुड्डा?
Swatantryaveer Savarkar : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट प्रोपोगंडा नाही; चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताना काय म्हणाले रणदीप हुड्डा?

बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाचा ट्रेलर सोमवार, ४ मार्च रोजी जुहू येथील पीव्हीआर चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आले. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि या चित्रपट वीर सावरकर यांची प्रमुख भूमिका केलेले रणदीप हुड्डा यांच्यासोबत चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित, संदीप सिंह, योगेश रहार उपस्थित होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे सशस्त्र क्रांतीची ज्योत पेटवणारे वीर सावरकर यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.

वीर सावरकर यांच्याविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न
२ तास ५५ मिनिटांचा हा चित्रपट असून या चित्रपटात रणदीप हुड्डा हे स्वतः अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली साथ मिळाली. या चित्रपटात रणदीप हुड्डा यांनी वीर सावरकरांची भूमिका साकारली आहे. तर वीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका अंकिता लोखंडे यांनी साकारली आहे. यावेळी पत्रकारांनी रणदीप हुड्डा यांनी, ‘आता लोकसभेची निवडणूक जवळ येत आहे, त्याच वेळी हा (Swatantryaveer Savarkar) चित्रपट प्रदर्शित होत आहे, त्यामुळे हा चित्रपट प्रोपोगंडा आहे का’, असा प्रश्न विचारला. त्यावर रणदीप हुड्डा म्हणाले, हा चित्रपट अजिबात प्रोपोगंडा नाही. हा चित्रपट (Swatantryaveer Savarkar) वीर सावरकर यांच्यावरील होणारे आरोप खोटे होते, त्यामागील वास्तव या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. तसेच वीर सावरकर यांच्या विषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा चित्रपट बनवताना आणि त्यात अभिनय करताना आपण वीर सावरकर यांचा खूप अभ्यास केला. वीर सावरकर यांचे विचार जाणून घेतले. वीर सावरकर यांनी कधीही ब्रिटिशांची माफी मागितली नव्हती, ते कायम ब्रिटिशांच्या विरोधातच होते, असे रणदीप हुड्डा म्हणाले.

New Project 2024 03 04T192931.508

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी कमबॅक…
अभिनेत्री अंकिता लोखंडेदेखील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अंकिता लोखंडे बऱ्याच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. अंकिताने या सिनेमामध्ये वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तिची व्यक्तिरेखा लक्षवेधी ठरणार आहे, असा विश्वासही अभिनेता रणदीपने व्यक्त केला.

ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली…
वीर सावरकरांच्या जीवनावर आधारित चित्रपट पडद्यावर आणण्यासाठी कठोर परिश्रम घेतल्याचे अभिनेता रणदीप हुड्डाने सांगितले. चित्रपट प्रदर्शित होण्याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ट्रेलरचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या मनामध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. या ट्रेलरमधून प्रेक्षकांना विनायक दामोदर सावरकर यांचा जीवन प्रवास आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष चित्रपटाद्वारे बघायला मिळणार आहे.

२२ मार्चला प्रदर्शित …
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटातील रणदीपने केलेली वीर सावरकर यांची व्यक्तिरेखा आणि अंकिताने त्यांची पत्नी ‘यमुनाबाई’ची साकारलेली भूमिका उल्लेखनीय ठरणार आहे. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट रणदीप हुड्डाने दिग्दर्शित केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर 22 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या मनावर जबरदस्त प्रभाव टाकण्यासाठी सज्ज होणार आहे, असेही तो म्हणाला.

तरुण प्रेक्षकांनी व्यक्त केल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया…
रणदीपने वीर सावरकर यांच्या व्यक्तिरेखेसाठी केलेले प्रयत्न चित्रपटातून पाहायला मिळतील. वीर सावरकरांचा खरा इतिहास आपल्याला कळेल. त्यांच्याविषयी खोटी शिकवण दिली जाते. सिनेमामुळे खरी माहिती कळेल. वीर सावरकर यांनी लिहिलेले ‘जयोस्तुते जयोस्तुते’ हे देशभक्तीपर गीत आजही माझ्या कानात गुंजत असून ते मला ऐकावेसे वाटते, अशा प्रतिक्रिया ट्रेलर पाहायला आलेल्या तरुण प्रेक्षकांनी व्यक्त केल्या.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.